Homeताज्या बातम्यादेश

LPG सिलेंडरचे नवीन दर जाहीर

१ जुलै रोजी म्हणजेच आज एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार १४.२ किलो एलपीजी सिलिंडर आणि १९ किलो व्यावसायि

रावसाहेब खेवरे यांची अ‍ॅड लांडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
IAS अधिकाऱ्याच्या मुलीचा उकळत्या तेलानं चेहरा जाळण्याचा प्रयत्न
पात्र-अपात्रतेचा फैसला !

१ जुलै रोजी म्हणजेच आज एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार १४.२ किलो एलपीजी सिलिंडर आणि १९ किलो व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशाप्रकारे आज देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये स्वयंपाकघरातील वापरासाठी एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपये आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत १७७३ रुपये आहे. जून महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ८३ रुपयांनी कमी झाली होती तर मे महिन्यातही व्यावसायिक सिलिंडर १७२ रुपयांनी स्वस्त झाले होते. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत ११०२.५० रुपये तर व्यावसायिक सिलेंडरचा भाव १७२५ रुपयांवर स्थिर आहे. तसेच इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, चेन्नईमध्ये एक एलपीजी एलपीजी सिलिंडर १११८.५० रुपयांना विकला जात असताना व्यावसायिक १९३७ रुपयाला विक्री होत आहे. सिलिंडरच्या किमतीत गेल्या वर्षभरात चढउतार पाहायला मिळाले आहेत. घरगुती एलपीजीच्या किमती कधी वाढल्या? गेल्या वर्षी ६ जुलै २०२३ रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ नोंदवली होती. आजपर्यंत देशाची राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत १०५३ रुपये, ज्यात ५० रुपये वाढ होऊन ११०३ रुपये झाली आहे. म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती एका वर्षापासून स्थिर आहेत. व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत दुसरीकडे, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात चढउतार सुरूच आहे. दिल्लीत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७६९ रुपये राहिली, ज्यात मार्च २०२३ मध्ये वाढ झाली आणि दर २११९.५० रुपयांवर पोहोचली. तर एप्रिल आणि मे मध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती अनुक्रमे २०२८ रुपये आणि १८५६.५० रुपयांवर घसरल्या. लक्षात घ्या की घरगुती सिलिंडर १४.२ किलोचे, तर व्यावसायिक सिलिंडर १९ किलोचे असते.

COMMENTS