Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश

मुंबई : महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या समस्यांचा आढावा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यां

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; सामाजिक समता सप्ताहाचा समारोप
मोहटादेवी देवस्थान येथे ‘निधी आपके निकट’ शिबीर उत्साहात
पाटोदा सुविधा केंद्रात कामगारांची लूट थांबवा; दोषींवर तात्काळ कारवाई करा – सचिन बोबडे

मुंबई : महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या समस्यांचा आढावा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी घेऊन कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीस महानिर्मिती, महापारेषण व महावितरणचे संबंधित अधिकारी आणि भारतीय मजदूर संघ प्रणित कंत्राटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत कंत्राटी कामगारांचे वेतन, सेवा अटी, सुरक्षितता, विमा संरक्षण या विषयी चर्चा करण्यात आली. कामगारांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. कंत्राटी कामगारांच्या समस्या संवेदनशीलतेने हाताळण्याबाबत सूचना देत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी कंत्राटी कामगारांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी नियमित बैठक घेण्याचे निर्देशही दिले.

COMMENTS