Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खामगावचे तापमान गेले 45 अंश सेल्सियसवर

खामगाव : विदर्भातील सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या खामगाव शहराचे 14 एप्रिल रोजी चे तापमान 42.5 अंश सेल्सिअस इतके होते. हे तापमान

पाणपोई हे पुण्यकर्म नव्हे तर आरोग्य सुविधा : सावंत
महामानवांच्या जयंतीनिमित्त केज बसस्थानकात ‘अक्षर’ सेवाभावी संस्थेकडून पाणपोईचे लोकार्पणपाच वर्षांची अखंड परंपरा; प्रवाशांची तहान भागवण्यासाठी स्तुत्य उपक्रम
महावितरणचा भोंगळ कारभार; तरोड्यात उकाड्यापेक्षा विजेच्या त्रासाने नागरिक हैराण
Delhi Records Hottest Day In 12 Years, Gurgaon Crosses 45 Degrees For First  Time In April | Top Developments


खामगाव : विदर्भातील सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या खामगाव शहराचे 14 एप्रिल रोजी चे तापमान 42.5 अंश सेल्सिअस इतके होते. हे तापमान यंदाच्या आज पर्यंतच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान आहे गेल्या दोन दिवसापासून तापमानात वाढ होत आहे 13 एप्रिल रोजीचे शहराचे तापमान 41.3 अंश सेल्सिअस इतके असल्याची माहिती येथील तापमानाचा छंद जोपासणारे राजकुमार गोयंका यांनी दिली.
13 ते 17 एप्रिल या कालावधीत तापमानात वाढ होत जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हा अंदाज शहराच्या तापमानात गेल्या दोन दिवसापासून वाढ होत असल्याने खरा ठरला आहे. तापमानाचा फटका हा वयोवृद्ध व बालकांना अधिक जाणवतो. राजकुमार गोयंका, तापमान मापक ओसाड टेकड्या अन् सिमेंट काँक्रिटीकरणामुळे होते वाढ खामगाव शहराची रचना कपबशी सारखी आहे शहराच्या चारही बाजूला टेकड्या आहेत. झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात झाल्याने या टेकड्या ओसाड पडले आहेत. त्याचबरोबर शहरात रस्ते हे सिमेंट काँक्रीट रस्ते तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शहराचे तापमान वाढण्यास वृक्ष कटाई व सिमेंटचे रस्ते हे एक कारण ठरत आहे. एप्रिल महिन्यातील पुढील दिवसात शहरातील तापमान वाढत जाणार असल्याचे चिन्हे आजच्या तापमानावरून दिसून येत आहे. दरवर्षी मे महिना हा सर्वाधिक हॉट असतो असा आजपर्यंतचा अनुभव शहरवासीयांना आहे.

COMMENTS