भोकर शहरात जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांचा

भोकर शहरात जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदुंग भजनी मंडळांचा नाद आणि भक्तिमय वातावरणात शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रवचन, भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
महात्मा बसवेश्वर यांच्या तैलचित्राची मिरवणूक महादेव मंदिर येथून प्रारंभ झाली. ही मिरवणूक वस्ताद लहुजी साळवे चौक, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक मार्गे पुन्हा महादेव मंदिर येथे पोहोचून तिची सांगता झाली. मिरवणुकीत बेलदरा, सावरगाव माळ, सोनारी, दापशेड, जुही व जाटीकोट येथील भजनी मंडळांनी सहभाग घेत भक्तिमय वातावरण निर्माण केले. विविध ठिकाणी नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत केले. रात्री 8 वाजता आयोजित प्रवचन कार्यक्रमात गोवत्स बालयोगी व्यंकट स्वामीजी महाराज (पिंपळगाव), महादेव शिवाचार्य महाराज (वाई मठ संस्थान) तसेच दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली (वसमत) यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा जागर केला. समाजात समता, मानवता आणि सदाचाराचा संदेश त्यांनी यावेळी दिला. या जयंती सोहळ्यास लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतीश देशमुख, स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष भगवानराव दंडवे, उपाध्यक्ष मनमथ शेडे, उज्ज्वल केसराळे, दत्ता शिरलवार, सचिव बालाजी येलपे, कोषाध्यक्ष बालाजी येलपे, शंकरराव देशमुख, सुभाष स्वामी, त्र्यंबक पटवेकर, हनमंतराव देशमुख, प्रकाशराव देशमुख, शिवशंकर हाजगुडे, बालाजी लोणे, चंद्रकांत विभुते, सुरेश ठोणे,अॅड. विशाल दंडवे आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS