Homeताज्या बातम्या

अजितदादांची निर्णयक्षम कार्यशैली महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल; माजी आमदार अशोकराव काळे यांचे प्रतिपादन

कोपरगाव: स्व. अजितदादांनी महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. विकासकामांना दिलेले प्राधान्य, सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि प्रशास

राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणी छापे; एसआयटीची ८ आरोपींच्या घरी एकाच वेळी धाड सत्र कारवाई
धांडेवाडीत वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी; रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचा उपक्रम
गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम उत्साहात; चैताली काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

कोपरगाव: स्व. अजितदादांनी महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. विकासकामांना दिलेले प्राधान्य, सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि प्रशासनावरील त्यांची भक्कम पकड यामुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांनी घालून दिलेला विकासाचा मार्ग पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून स्व. अजितदादांचे नेतृत्व, विकासाची दूरदृष्टी आणि निर्णयक्षम कार्यशैली महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशा शब्दांत माजी आमदार अशोकराव काळे यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री तथा माजी अर्थमंत्री अजित पवार यांना आदरांजली अर्पण केली.

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना माजी आमदार अशोकराव काळे म्हणाले की, बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना मन सुन्न होते. सामाजिक आणि राजकीय जीवनात तावून-सुलाखून निघालेले अजितदादांसारखे नेतृत्व घडण्यासाठी अनेक दशके लागतात. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जिव्हाळ्याचे संबंध जपणारे दादा अचानक आपल्यातून निघून जातील, अशी कल्पनाही कधी केली नव्हती.

ते पुढे म्हणाले की, विरोधी पक्षातील आमदारांनाही विकासकामांसाठी उदारपणे निधी देणारे अर्थमंत्री म्हणून अजितदादा मी जवळून अनुभवले आहेत. माझ्या दोन पंचवार्षिक कार्यकाळात मी विरोधी पक्षाचा आमदार असतानाही त्यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे अनेक ऐतिहासिक विकासकामे मार्गी लागली.

याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे, संचालक राजेंद्र घुमरे, सूर्यभान कोळपे, दिलीपराव बोरनारे, श्रीराम राजेभोसले, सचिन चांदगुडे, शंकरराव चव्हाण, सुनील मांजरे, मनोज जगझाप, प्रशांत घुले, डॉ. मच्छिंद्र बर्डे, अशोकराव मवाळ, विष्णू शिंदे, श्रावण आसने, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संदीप शिरसाठ तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS