Homeव्हिडीओ

जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल; करचोरी रोखण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) वापरणारे देशातील पहिले राज्य ठरले!

https://youtu.be/n7NB5wz07YE देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलन करण्यामध्ये महाराष्ट्र हे अव्वल क्रमांकावर असून, कर संकलनाच

राज्यात सीएसआर निधीच्या वाटपात प्रादेशिक असमतोलतब्बल 8 हजार 630 कोटींपैकी 51 टक्के निधी एकट्या मुंबईत
बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार असून महाराष्ट्र बनणार ग्लोबल सप्लाय चेनचे मुख्य केंद्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी शासनासाठी उपयुक्त ठरणार : मुख्यमंत्री फडणवीस; इक्विनिक्स एमबी 3 डेटा सेंटरचे उद्घाटन

देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलन करण्यामध्ये महाराष्ट्र हे अव्वल क्रमांकावर असून, कर संकलनाच्या मोबदल्यात केंद्र शासनाकडून सर्वाधिक लाभ मिळवणारे राज्यही महाराष्ट्रच आहे. त्यामुळे जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची खरी आर्थिक राजधानी ठरली आहे, असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात आयोजित नवव्या वस्तू व सेवा कर दिवस समारंभात ते बोलत होते. देशामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित यंत्रणा उभारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचा महत्त्वपूर्ण खुलासाही त्यांनी यावेळी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वात लागू करण्यात आलेली जीएसटी व्यवस्था ही एक देश, एक कर आणि एक बाजार अशी संकल्पना साकारणारी ऐतिहासिक वित्तीय सुधारणा आहे. सुरुवातीला राज्यांच्या उत्पन्नाबाबत संदिग्धता असताना केंद्र सरकारने महसुली तूट भरून काढण्याची हमी दिली आणि पुढील पाच वर्षे चौदा टक्के वाढीव दराने परतावा देण्यास मान्यता दिली, हा या योजनेचा सर्वात मोठा टप्पा होता. आता ही व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटी २.० टप्पा सुरू केला असून, जीएसटी कौन्सिलच्या पारदर्शक कारभारामुळे दैनंदिन वस्तू आणि लघु उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. विसाव्या शतकातील सर्वात मोठे डिजिटल संशोधन असलेल्या जीएसटीएन नेटवर्कमुळे राजकोषीय उत्पन्न थेट जमा होणे शक्य झाले असून, यामुळे भारत हा प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या करदात्यांचा देश बनला आहे.

COMMENTS