Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी शासनासाठी उपयुक्त ठरणार : मुख्यमंत्री फडणवीस; इक्विनिक्स एमबी 3 डेटा सेंटरचे उद्घाटन

मुंबई : विविध शासकीय योजनांच्या ऑनलाईन अंमलबजावणीदरम्यान बँडविड्थची कमतरता ही मोठी अडचण ठरत होती. विशेषतः शेतकर्‍यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सु

अकोले तालुक्यात जनगणनेसाठी प्रशासन सज्ज४५८ प्रगणक व ६९ पर्यवेक्षकांना प्रशिक्षण; डिजिटल पद्धतीने जनगणना
जगासाठी हे दशक आपत्तीचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना, युद्धांनंतर जागतिक ऊर्जा संकटाकडे वेधले लक्ष
अधिकृत आधार सेवा केंद्राचाच वापर करा :  कारंडे 

मुंबई : विविध शासकीय योजनांच्या ऑनलाईन अंमलबजावणीदरम्यान बँडविड्थची कमतरता ही मोठी अडचण ठरत होती. विशेषतः शेतकर्‍यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केल्यावर अचानक वाढणार्‍या इंटरनेट ट्रॅफिकमुळे प्रणाली कोलमडण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असायची. अशा परिस्थितीत डेटा सेंटरमधील प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी आणि तत्काळ बँडविड्थ वाढविण्याची क्षमता शासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस हस्ते वर्षा निवासस्थानी इक्विनिक्स कंपनीच्या एमबी 3 डेटा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी.अन्बळगन, मुख्य आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच एपीएसीचे अध्यक्ष सायरस अडग्रा, इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज पॉल, व्ही.पी. ग्रोथ अँड इमर्जिंग मार्केटचे मॅक्स पॅरी, आयबीएक्सचे वरिष्ठ संचालक गणेश पवार, पब्लिक पॉलिसी अँड गव्हर्नन्सच्या संचालक एलिजाबेथ हर्नांडेझ उपस्थित होते. इक्विनिक्स ही जगातील सर्वात मोठी डेटा सेंटर आणि इंटरकनेक्शन सेवा देणारी कंपनी असून, 36 देशांतील 77 महानगरांमध्ये 280 डेटा सेंटर्सचे जाळे कंपनीकडे आहे. भारतातील इक्विनिक्सचे पूर्णतः स्वतःच्या मालकीचे आणि नव्याने उभारलेले एमबी 3 हे पहिले डेटा सेंटर आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 3.7 एकर जागेवर उभारणी करण्यात आली असून, एकूण गुंतवणूक सुमारे 750 दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे 6,000 कोटी रुपये) इतकी आहे. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथे 4,200 हून अधिक कॅबिनेट्सची क्षमता उपलब्ध होणार आहे. एमबी 3 डेटा सेंटर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेवांसाठी सक्षम आहे. तसेच, हायब्रिड मल्टी-क्लाउड इंटरकनेक्शन सुविधेद्वारे जगभरातील इक्विनिक्सच्या डेटा सेंटर्सशी तसेच 11 हजाराहून अधिक ग्राहकांशी जोडणी शक्य होणार आहे. ऊर्जा शाश्‍वततेच्या दृष्टीने यवतमाळ येथे उभारण्यात आलेल्या 26.6 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून या डेटा सेंटरसाठी आवश्यक ऊर्जेचा मोठा भाग उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या मुंबईतील इक्विनिक्स डेटा सेंटर्समध्ये वापरल्या जाणार्‍या उर्जेपैकी सुमारे 60 टक्के ऊर्जा या सौर प्रकल्पातून मिळते.

COMMENTS