Homeताज्या बातम्या

२५ वर्षांपासूनचा डीपीचा प्रश्न अखेर निकाली; नगरसेविका समीक्षा गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश

बीड: शहरातील वॉर्ड क्रमांक १३ मधील तुळजाई चौक ते पंचशील नगर या मुख्य रस्त्यावर गेल्या सुमारे २५ वर्षांपासून वाहतुकीस अडथळा ठरत असलेली महावितरणची

पुण्यात आज भाजपची तिरंगा रॅली; ललित महल चौक ते गरवारे चौक मार्गावर निर्बंध
पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुकुल गोशाळेत गोवंशांना चारा वाटप; इर्शादभाई यांच्या उपक्रमाचे कौतुक
किनवटचा ’कोंडवाडा’ आणि प्रशासनाचे ’बधिर’ मौन! मोकाट गाढवे व खेचरांमुळे नागरिक त्रस्त, आंदोलनाचा इशारा

बीड: शहरातील वॉर्ड क्रमांक १३ मधील तुळजाई चौक ते पंचशील नगर या मुख्य रस्त्यावर गेल्या सुमारे २५ वर्षांपासून वाहतुकीस अडथळा ठरत असलेली महावितरणची डीपी (ट्रान्सफॉर्मर) अखेर हटविण्यात आली आहे. नगरसेविका सौ. समीक्षा मुन्ना गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला.

तुळजाई चौक ते पंचशील नगर या मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डीपीमुळे वाहनचालक आणि पादचार्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच अपघाताचा धोका कायम असल्याने नागरिकांकडून ती हटविण्याची मागणी सातत्याने होत होती.

नगरसेविका सौ. समीक्षा मुन्ना गायकवाड यांनी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून हा प्रश्न प्राधान्याने मांडला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने डीपी हटविण्यात आली असून आता या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि सुलभ होणार आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून नगरसेविका सौ. समीक्षा मुन्ना गायकवाड यांच्या प्रयत्नांचे नागरिकांनी कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत.

COMMENTS