Homeताज्या बातम्या

मातोश्री विद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा स्मृतीदिन उत्साहात साजरा

Oplus_131072 बीड : तालुक्यातील आदर्शगाव वंजारवाडी येथील छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकनेते स्

परळी येथे पैशांच्या वादातून मित्राकडूनच तरुणाची हत्या; रेल्वे रुळावर मृतदेह टाकून अपघाताचा बनाव
साबला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात; कर्तृत्ववान महिलांचा ‘महिला सन्मान पुरस्कारा’ने गौरव
पाटोदा येथे आमेरखान पठाण यांचा रिसेप्शन सोहळा उत्साहात संपन्न; वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काजींची उपस्थिती
Oplus_131072

बीड : तालुक्यातील आदर्शगाव वंजारवाडी येथील छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा स्मृतीदिन विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव अ‍ॅड. सर्जेराव तात्या तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. नागरगोजे सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. भुतकर सर व श्री. डोंगरे सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी प्राचार्य नागरगोजे सर, श्री. भुतकर सर, श्री. जाधव सर, श्री. डोंगरे सर आणि श्री. तांदळे सर यांनी स्व. मुंडे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहितकारी कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख व जबाबदार नागरिक घडावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. बिनवडे सर व श्री. हानुमंत दादा तांदळे यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोमेश तांदळे यांनी केले.

COMMENTS