Homeताज्या बातम्या

बाळेवाडी गावामध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार हेच उद्दिष्ट

आष्टी : तालुक्यातील बाळेवाडी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न श्री छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथ

आष्टी येथील फार्मसी कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न; 9 विद्यार्थ्यांची निवड
पॉलिसीतून साकारले स्वप्नवत लग्न; वधू-वरांसाठी विम्याची अनोखी भेट!गायत्री-आकाश विवाह सोहळा ठरला आर्थिक नियोजनाचा आदर्श; विमा प्रतिनिधी रमेश भोगाडे यांच्या कार्याची दखल
श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड विकासकामांना मिळणार वेग उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

आष्टी : तालुक्यातील बाळेवाडी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न श्री छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत आगमन झाले. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत कृषीदूतांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

या कृषीदूतांमध्ये सागर सुळे, मयूर सांगळे, लोकेश भिसे, पवन आमटे, आकाश बाहिर, महेश वीर, तुषार मधने आणि ऋषिकेश सांगळे यांचा समावेश आहे. कृषीदूतांनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, मृदा परीक्षण, जैविक शेती, पीक संरक्षण तसेच विविध शासकीय कृषी योजनांविषयी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. आरसुळ, कार्यक्रम समन्वयक प्रा. रोहिणी शिंदे आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. आर. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत कृषीदूत गावामध्ये विविध कृषी प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावे, मृदा नमुना संकलन आणि जनजागृती उपक्रम आयोजित करणार आहेत.

या स्वागत प्रसंगी सरपंच लता रंगनाथ बर्डे, उपसरपंच बापू निवृत्ती पठारे, सदस्य नवनाथ यमाजी शेलार, बापू किसन काळे, नानुबाई भगवान गव्हाने, ज्योती अशोक गाडे, शिला अशोक पठारे, दादासाहेब पठारे (आर्टिस्ट) यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवून शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत बनविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे कृषीदूतांनी सांगितले.

COMMENTS