Homeताज्या बातम्या

आचारसंहिता कालावधीतही बॅनरबाजीचा सुळसुळाट; मुख्याधिकारी शैलेश फणसे यांचे दुर्लक्ष?

नगरपरिषद प्रशासन मुंबईतील घाटकोपरसारख्या दुर्घटनेची वाट पाहतंय काय? : डॉ. गणेश ढवळे बीड : विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसं

स्ट्रक्चरल ऑडिटची नाटकं बंद करा, मोडकळीस आलेल्या शाळांची तातडीने दुरुस्ती करा-डॉ.गणेश ढवळेन्यायालयाच्या निर्देशांकडे तीन वर्षांपासून दुर्लक्ष; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप
पेट्रोल-डिझेल टंचाई आणि महागाईविरोधात दुचाकी वाहनांची अंत्ययात्रा; बीडमध्ये लक्ष्यवेधी आंदोलन
देवाभाऊंचे शेतकर्‍यांना कर्जमाफीचे गाजर! कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती हवी; सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा!जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर वाटप करून लक्षवेधी आंदोलन; डॉ. गणेश ढवळे यांचा शासनावर निशाणा

नगरपरिषद प्रशासन मुंबईतील घाटकोपरसारख्या दुर्घटनेची वाट पाहतंय काय? : डॉ. गणेश ढवळे

बीड : विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात लागू झाली असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. १८ मे ते २५ जून २०२६ या कालावधीत नियमभंग करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर मार्गदर्शक सूचनांनुसार नगरपरिषद प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्स हटविणे, सार्वजनिक ठिकाणचे राजकीय फलक काढणे आवश्यक आहे. मात्र बीड शहरात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे. गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक नुकसान झाले असतानाही शहरातील विविध चौकांमध्ये नगरपरिषद आणि इतर शासकीय विभागांच्या जागांवर मोठ्या प्रमाणात लोखंडी सांगाड्यांचे होर्डिंग्ज उभे आहेत. अधिकृतरीत्या केवळ ८० होर्डिंग्जना परवानगी असताना शहरात सुमारे ६०० हून अधिक अनधिकृत होर्डिंग्जचे सांगाडे उभारण्यात आल्याचा दावा डॉ. ढवळे यांनी केला आहे.

मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून वादळी वाऱ्यांमुळे हे अवाढव्य लोखंडी सांगाडे कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व विनापरवाना होर्डिंग्ज २४ तासांत हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीदेखील बीड नगरपरिषद प्रशासनाकडून या आदेशांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, मुंबईतील घाटकोपरसारख्या दुर्घटनेची वाट प्रशासन पाहत आहे काय? असा संतप्त सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS