आष्टी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) संलग्न श्री छत्रपती शाहू, फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींचे

आष्टी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) संलग्न श्री छत्रपती शाहू, फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींचे (कृषीकन्या) कासारी या गावात आगमन झाले आहे. यावेळी कासारी गावातील सरपंच, ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी सर्व कृषीकन्यांचे उत्साहात स्वागत केले.
या उपक्रमात कृषीकन्या समृद्धी सोनवणे, हर्षदा गोल्हार, अंजली चिरा, दीक्षा राठोड, पूनम मेहत्रे, वैष्णवी गिरी आणि रजिता साधू यांचा समावेश आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. आरसूळ आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रम समन्वयक प्रा. रोहिणी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२६-२७’ अंतर्गत शेतकाऱ्यांशी संवाद साधला.
या कालावधीत कृषीकन्या प्रत्यक्ष गावात राहून शेतीकामांचा अनुभव घेणार आहेत. यामध्ये माती परीक्षण, कीड व रोग नियंत्रण, बीजप्रक्रिया, पिकांसाठी अनुकूल वातावरण, तसेच आधुनिक शेती पद्धती याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. याप्रसंगी गावच्या सरपंच सौ. शालन मुळे, उपसरपंच जालिंदर वांढरे, ग्रामपंचायत सदस्य भागवत गिरी, सुनील बन, राजेंद्र बन, भागवत पुरी, सदाशिव अष्टेकर यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS