Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड तालुक्यात कर्ज वसुली ५१.४३ टक्के; ठेवींमध्येही विक्रम; जिल्हा बँकेची प्रगतशील कामगिरी

जामखेड : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जामखेड तालुक्यात मार्च २०२६ अखेर कर्ज वसुलीचे प्रमाण ५१.४३ टक्क्यांवर पोहोचले असून ठेवींमध्य

बेलापूर बायपासवरील गतिरोधकाचे काम पूर्ण
कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी नूतन इमारतीचे भूमिपूजन
रोहमारे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जामखेड : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जामखेड तालुक्यात मार्च २०२६ अखेर कर्ज वसुलीचे प्रमाण ५१.४३ टक्क्यांवर पोहोचले असून ठेवींमध्येही लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही तालुक्यातील शेतकरी सभासदांनी चांगल्या प्रकारे कर्जफेड केल्याची माहिती बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी दिली.

यावेळी बोलताना राळेभात म्हणाले की, जिल्हा सहकारी बँक आशिया खंडातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते. बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील, व्हा. चेअरमन व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची ही ओळख अधिक बळकट करण्याचे काम सुरू आहे.

खातेदारांनी बँकेवर दाखविलेल्या विश्वासामुळे मार्च २०२६ अखेर बँकेच्या ठेवींनी विक्रमी ११,३११ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तसेच सोनेतारण कर्ज योजनेत बदल करून प्रति व्यक्ती कर्जमर्यादा ५ लाख रुपये करण्यात आली असून ८ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला जात आहे. जामखेड तालुक्यातील पाच शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध असून अरणगाव शाखेत नव्याने सेवा सुरू करण्यात आली आहे.

बँक डिजिटल सेवांमध्येही आघाडीवर असून फोन पे, मोबाइल बँकिंग, गुगल पे या सुविधा कार्यरत आहेत. लवकरच व्यावसायिकांसाठी बारकोड सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचेही राळेभात यांनी सांगितले. रिझर्व्ह बँक व नाबार्डने ठरवून दिलेल्या नियमांनुसार बँकेचे कामकाज सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मार्केट कमिटी संचालक विठ्ठल चव्हाण, गजानन शिंदे, जामखेड संस्थेचे चेअरमन अंकुश कोल्हे, तालुका सचिव नितीन सपकाळ, तालुका विकास अधिकारी दरगुडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS