Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अफवांमुळे उसळलेली गर्दी ओसरली; राहात्यात इंधन व गॅस पुरवठा सुरळीत; ‘उज्वला’लाच्या वितरणात अडचणी

राहाता : काही दिवसांपूर्वी पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस टंचाईच्या अफवांमुळे राहाता परिसरात पेट्रोल पंप व गॅस एजन्सींवर मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. मात्र सध्या परिस्थिती पूर्णपणे सुरळीत झाली असून इंधन व गॅस पुरवठा नियमितपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधनटंचाईची भीती व्यक्त करत काही ठिकाणी अफवा पसरविण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणावर पेट्रोल, डिझेल व गॅस खरेदीसाठी गर्दी केली होती. परिणामी काही दिवस पेट्रोल पंप व गॅस एजन्सींवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अचानक वाढलेल्या मागणीमुळे प्रशासनावरही ताण निर्माण झाला होता. दरम्यान, इन्डेन गॅस वितरकांकडून दिवसाआड सुमारे ५२५ सिलेंडरचा पुरवठा नियमितपणे होत असल्याची माहिती देण्यात आली. सध्या गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून ग्राहकांनी केवायसी प्रलंबित असल्यास ती पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एस. पी. गॅस एजन्सीकडूनही गॅस वितरण सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र तळेगाव येथील काही ग्राहकांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेत होत नसल्याची तक्रार केली आहे. गेल्या आठवडाभरापासून गॅसची गाडी न आल्याने संबंधित लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर पुरवठा अधिकारी खरात यांनी राहाता व शिर्डी परिसरातील गॅस एजन्सींचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या आहेत. सध्या पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबई बंदरात अडकला शेतीमाल; कोट्यवधींचे नुकसान; सरकारच्या धोरणांवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची टीका
युद्धविराम आणि आशियाई देशांचा सुटकेचा निःश्‍वास
इंधन साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

राहाता : काही दिवसांपूर्वी पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस टंचाईच्या अफवांमुळे राहाता परिसरात पेट्रोल पंप व गॅस एजन्सींवर मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. मात्र सध्या परिस्थिती पूर्णपणे सुरळीत झाली असून इंधन व गॅस पुरवठा नियमितपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधनटंचाईची भीती व्यक्त करत काही ठिकाणी अफवा पसरविण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणावर पेट्रोल, डिझेल व गॅस खरेदीसाठी गर्दी केली होती. परिणामी काही दिवस पेट्रोल पंप व गॅस एजन्सींवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अचानक वाढलेल्या मागणीमुळे प्रशासनावरही ताण निर्माण झाला होता.

दरम्यान, इन्डेन गॅस वितरकांकडून दिवसाआड सुमारे ५२५ सिलेंडरचा पुरवठा नियमितपणे होत असल्याची माहिती देण्यात आली. सध्या गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून ग्राहकांनी केवायसी प्रलंबित असल्यास ती पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एस. पी. गॅस एजन्सीकडूनही गॅस वितरण सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मात्र तळेगाव येथील काही ग्राहकांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेत होत नसल्याची तक्रार केली आहे. गेल्या आठवडाभरापासून गॅसची गाडी न आल्याने संबंधित लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जाते.

या पार्श्वभूमीवर पुरवठा अधिकारी खरात यांनी राहाता व शिर्डी परिसरातील गॅस एजन्सींचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या आहेत. सध्या पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS