Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी नवे सीडीएस

नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करत केंद्र सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची नवे संरक्षण प्रमुख

भारत-कंबोडिया संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय तुकडी रवाना
प. बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी पर्वाला सुरूवात; मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ; पंतप्रधान मोदींसह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती
कच्च्या तेलाच्या किमती 17 टक्क्यांनी घसरल्या
India New CDS: देश के नए सीडीएस बने रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल एन एस राजा  सुब्रमणि, हाथ में होगा तीनों सेनाओं का कंट्रोल - lieutenant general n s raja  subramani becomes ...

नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करत केंद्र सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची नवे संरक्षण प्रमुख अर्थात सीडीएस म्हणून नियुक्ती केली आहे. विद्यमान संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत असून, त्यानंतर राजा सुब्रमणी हे देशाच्या तिन्ही संरक्षण दलांमधील समन्वयाची धुरा सांभाळतील. संरक्षण प्रमुख पदासोबतच ते संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही कार्यरत राहणार आहेत.
राजा सुब्रमणी हे भारतीय सैन्यातील अनुभवी आणि धोरणात्मक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. जवळपास 39 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळल्या. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केले असून, उपसेनाप्रमुख पदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली होती. तसेच मध्य विभागाचे प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी सीमावर्ती भागातील लष्करी नियोजन आणि सुरक्षा व्यवस्थेचे नेतृत्व केले होते. भारतीय संरक्षण दलांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 1 जानेवारी 2020 रोजी संरक्षण प्रमुख हे पद निर्माण केले. तिन्ही सैन्यदलांमध्ये संयुक्त धोरण, आधुनिक युद्धतंत्र आणि निर्णय प्रक्रियेला गती देण्याच्या उद्देशाने या पदाची स्थापना करण्यात आली होती. या पदावर नियुक्त होणारे पहिले अधिकारी जनरल बिपिन रावत होते. मात्र डिसेंबर 2021 मध्ये तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचे निधन झाले. त्यानंतर काही काळ हे पद रिक्त राहिले होते. सप्टेंबर 2022 मध्ये जनरल अनिल चौहान यांची दुसरे संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात संरक्षण दलांमध्ये समन्वय वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सीमावर्ती सुरक्षेला बळकटी देण्यावर भर देण्यात आला. आता राजा सुब्रमणी यांच्या नियुक्तीमुळे संरक्षण व्यवस्थेला अनुभवी आणि धोरणात्मक नेतृत्व मिळाल्याचे मानले जात आहे.

COMMENTS