Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

इंधन टंचाईमुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हाव्यातमहसूल मंत्री बावनकुळे यांचे वक्तव्य ; नागपूरमध्ये महायुतीकडे बहुमत

नागपूर : राज्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या परिस्थितीत शक्य त्या ठिकाणी विधान परिषद निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले जाणार अ

किनवट तहसीलदारांचे ‘रात्रीस खेळ चाले’ प्रकरण तापले! लाचलुचपत व बेकायदेशीर रेती उपशाप्रकरणी २९ मे रोजी सुनावणी
महाराष्ट्रात मंत्र्यांच्या विमान प्रवासावर निर्बंधमुख्यमंत्री फडणवीस यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक
महाराष्ट्रात आता सरकारी जमिनीवर गवत लागवड! महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना


नागपूर : राज्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या परिस्थितीत शक्य त्या ठिकाणी विधान परिषद निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नागपूर विधान परिषद मतदारसंघात महायुतीकडे सुमारे पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक मते असल्याचा दावा करत, या जागेबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, राज्यासमोर सध्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईचे गंभीर आव्हान उभे आहे. अशा परिस्थितीत ज्या निवडणुका बिनविरोध होऊ शकतात, त्या तशाच पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न व्हायला हवा. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. महायुतीतील जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्रितपणे चर्चा करून निर्णय घेतील. अनेक ठिकाणी सर्वपक्षीय सहमतीने मार्ग निघू शकतो, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेनंतर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम जागतिक इंधन पुरवठ्यावर होत असल्याचे सांगत बावनकुळे यांनी या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण झाल्याचे नमूद केले. या संकटाचे पडसाद देशात उमटत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले. कोरोना काळात जसे नागरिकांनी संयम आणि सहकार्याची भूमिका घेतली, त्याचप्रमाणे सध्याच्या परिस्थितीतही राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. वाहतूक कोंडी आणि इंधन बचतीच्या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठकींसाठी काही मंत्र्यांना आभासी माध्यमातून सहभागी होण्याची मुभा दिली जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. ज्या मंत्र्यांच्या खात्यांशी संबंधित विषय बैठकीत असतील, त्यांनाच प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल. उर्वरित मंत्री दूरसंवाद पद्धतीने सहभागी होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS