Homeताज्या बातम्या

जेव्हा थेट महसूलमंत्र्यांचा शेतकरी प्रतिनिधीला फोन येतो…

श्रीगोंदा : शेतकऱ्यांसाठी शेतपाणंद रस्त्यांच्या अंमलबजावणीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयांचा प्रत्यक्ष परिणाम जाणून घेण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवपानंद रस्ते चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर संवाद साधला. एका शेतकरी प्रतिनिधीशी थेट संपर्क साधून शासन निर्णयांवर प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या या उपक्रमाची परिसरात चर्चा होत आहे.महसूलमंत्र्यांनी सुमारे पाच मिनिटे दूरध्वनीवरून संवाद साधत शेतपाणंद रस्त्यांबाबत राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना, शासनाच्या नव्या निर्णयांविषयीचा प्रतिसाद तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे का, याचीही त्यांनी विचारपूस केली.यावेळी दादासाहेब जंगले पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून महसूलमंत्री सातत्याने संपर्कात राहून शेतपाणंद रस्त्यांच्या कामांमधील प्रत्यक्ष अडचणी जाणून घेत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या सूचना आणि अनुभवांच्या आधारे शासन निर्णयांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येत असल्याने या प्रक्रियेमुळे अंमलबजावणी अधिक प्रभावी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.राज्यातील शेतपाणंद रस्त्यांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या त्रुटी, अडचणी आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा सातत्याने शासनापर्यंत पोहोचवून आवश्यक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे जंगले पाटील यांनी महसूलमंत्र्यांना सांगितले.शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी स्वतः पुढाकार घेतल्याबद्दल महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचे दादासाहेब जंगले पाटील यांनी आभार मानले. शासन आणि शेतकरी यांच्यातील थेट संवादामुळे शेतपाणंद रस्त्यांच्या प्रश्नांना अधिक गतीने न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ऐतिहासिक रस्ता, चौक, वास्तूस भूषण देशमुखांचे नाव द्यावे : गुगळे  
दफनविधीनंतर ‘मृत’ शब्बीर जिवंत परतला !व्हॉट्सॲपवरील फोटोने उलगडले रहस्य;  प्रशासनापुढे पेच
पोलीस ठाण्याच्या आवारात धिंगाणा घालणाऱ्यावर गुन्हा  

COMMENTS