Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावात ‘पॅलिएटिव्ह केअर अँड पेन युनिट’ची सुरुवात

कोपरगाव : शहरातील साई पॉलीक्लिनिक येथे ‘पॅलिएटिव्ह केअर अँड पेन युनिट’ची सुरुवात करण्यात आली असून, या अत्याधुनिक सुविधेमुळे अतिदक्षता नंतरच्या रुग्णांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार मिळणार आहेत. कोपरगावच्या वैद्यकीय क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. डी. एस. मुळे यांनी व्यक्त केले. सुप्रसिद्ध सर्जन डॉ. राजेश माळी यांच्या साई पॉलीक्लिनिकमध्ये त्यांचे सुपुत्र डॉ. साहिल माळी यांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन ही सुविधा सुरू केली आहे. अतिदक्षता विभागात उपचार घेतलेल्या रुग्णांना पुढील काळात विशेष काळजी व वेदनाशामक उपचारांची गरज भासते. ही गरज ओळखून या युनिटमध्ये अत्याधुनिक उपकरणे व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या सुविधेमुळे कोपरगाव व परिसरातील रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज भासणार नाही. परिणामी रुग्णांचा वेळ, खर्च व त्रास मोठ्या प्रमाणात वाचणार असल्याचेही सांगण्यात आले.  डॉ. साहिल माळी यांनी भारतात एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत ‘फेलोशिप इन पॅलिएटिव्ह मेडिसिन’ व ‘पॅलिएटिव्ह केअर फिजिशियन’ पदवी संपादन केली आहे. साई पॉलीक्लिनिकचा हा उपक्रम आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात असून नागरिकांकडून त्याचे स्वागत होत आहे.  यावेळी बालरोगतज्ञ डॉ. अमोल अजमेरे, कान-नाक-घसा तज्ञ डॉ. रवींद्र कुलकर्णी, आयुर्वेदतज्ञ डॉ. तुषार गलंडे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. योगेश बनकर, रेडियोलॉजिस्ट डॉ. शिरीष मुळे यांच्यासह सौ. सुवर्णा माळी, श्रीमती अरुणा माळी, डॉ. भास्कर, डॉ. बंडू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

तीन वर्षांत गुन्हेगारीवर मोठा लगाम; श्रीगोंदा पोलिसांची धडक कारवाई; २८७६ गुन्हे दाखल, २३९८ गुन्ह्यांची उकल
काकडे महाविद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात
देवळाली प्रवरात ‘श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज’ यात्रोत्सव

कोपरगाव : शहरातील साई पॉलीक्लिनिक येथे ‘पॅलिएटिव्ह केअर अँड पेन युनिट’ची सुरुवात करण्यात आली असून, या अत्याधुनिक सुविधेमुळे अतिदक्षता नंतरच्या रुग्णांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार मिळणार आहेत. कोपरगावच्या वैद्यकीय क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. डी. एस. मुळे यांनी व्यक्त केले.

सुप्रसिद्ध सर्जन डॉ. राजेश माळी यांच्या साई पॉलीक्लिनिकमध्ये त्यांचे सुपुत्र डॉ. साहिल माळी यांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन ही सुविधा सुरू केली आहे. अतिदक्षता विभागात उपचार घेतलेल्या रुग्णांना पुढील काळात विशेष काळजी व वेदनाशामक उपचारांची गरज भासते. ही गरज ओळखून या युनिटमध्ये अत्याधुनिक उपकरणे व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या सुविधेमुळे कोपरगाव व परिसरातील रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज भासणार नाही. परिणामी रुग्णांचा वेळ, खर्च व त्रास मोठ्या प्रमाणात वाचणार असल्याचेही सांगण्यात आले.

 डॉ. साहिल माळी यांनी भारतात एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत ‘फेलोशिप इन पॅलिएटिव्ह मेडिसिन’ व ‘पॅलिएटिव्ह केअर फिजिशियन’ पदवी संपादन केली आहे. साई पॉलीक्लिनिकचा हा उपक्रम आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात असून नागरिकांकडून त्याचे स्वागत होत आहे.

 यावेळी बालरोगतज्ञ डॉ. अमोल अजमेरे, कान-नाक-घसा तज्ञ डॉ. रवींद्र कुलकर्णी, आयुर्वेदतज्ञ डॉ. तुषार गलंडे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. योगेश बनकर, रेडियोलॉजिस्ट डॉ. शिरीष मुळे यांच्यासह सौ. सुवर्णा माळी, श्रीमती अरुणा माळी, डॉ. भास्कर, डॉ. बंडू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

COMMENTS