कर्जत : रामनवमीच्या निमित्ताने कर्जत शहरात उत्साह, भक्ती आणि धार्मिक वातावरणाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. विविध धार्मिक कार्यक्रम, भव्य देखावे आणि मिरवणुकांच्या माध्यमातून संपूर्ण कर्जत शहर अक्षरशः ‘राममय’ झाले होते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकात अखंड हिंदू समाजाच्या वतीने प्रभू श्रीरामाचा आकर्षक भव्य देखावा उभारण्यात आला होता. सकाळी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले, तर सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. येथील श्रीराम मंदिरात पहाटेच धार्मिक विधींना सुरुवात झाली. श्रीरामांच्या मूर्तीवर महाअभिषेक करण्यात आला, त्यानंतर संगीत भजनाचा कार्यक्रम रंगला. दुपारी रामजन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरातही रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ज्ञानामृत मठ येथेही दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. पहाटे शंकर महाराज, दत्त महाराज आणि बजरंगबली यांच्या मूर्तींना महाअभिषेक करण्यात आला. दुपारी रामजन्म सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी दुर्गाष्टमी निमित्त भव्य पालखी सोहळा, महाआरती आणि पुन्हा महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कर्जत : रामनवमीच्या निमित्ताने कर्जत शहरात उत्साह, भक्ती आणि धार्मिक वातावरणाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. विविध धार्मिक कार्यक्रम, भव्य देखावे आणि मिरवणुकांच्या माध्यमातून संपूर्ण कर्जत शहर अक्षरशः ‘राममय’ झाले होते.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकात अखंड हिंदू समाजाच्या वतीने प्रभू श्रीरामाचा आकर्षक भव्य देखावा उभारण्यात आला होता. सकाळी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले, तर सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. येथील श्रीराम मंदिरात पहाटेच धार्मिक विधींना सुरुवात झाली. श्रीरामांच्या मूर्तीवर महाअभिषेक करण्यात आला, त्यानंतर संगीत भजनाचा कार्यक्रम रंगला. दुपारी रामजन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरातही रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ज्ञानामृत मठ येथेही दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. पहाटे शंकर महाराज, दत्त महाराज आणि बजरंगबली यांच्या मूर्तींना महाअभिषेक करण्यात आला. दुपारी रामजन्म सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी दुर्गाष्टमी निमित्त भव्य पालखी सोहळा, महाआरती आणि पुन्हा महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS