Homeताज्या बातम्या

अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी कठोर कारवाईची मागणी; सकल हिंदू समाजाचे शेवगाव पोलिसांना निवेदन

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील एका अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी संबंधित आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा द

ट्रॅक्टर-दुचाकीचा अपघात; दोघांचा होरपळून मृत्यू
ड्रोन व चोरट्यांबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये; पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे आवाहन
महावितरणचा मनमानी कारभार; अमोलक रिसर्च सेंटरच्या ‘देवराई गार्डन’मधील झाडांची विनापरवाना कत्तल!

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील एका अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी संबंधित आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी (दि. १३ जून २०२६) सकल हिंदू समाजाच्या वतीने शेवगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी हजारो युवकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र येत प्रशासनाकडे कठोर कारवाईची आग्रही मागणी केली.

सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी विभागीय पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शेवगाव तालुक्यातील एका अल्पवयीन हिंदू तरुणीने कथित मानसिक त्रासाला कंटाळून गेल्या आठवड्यात आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या सहआरोपींवर कठोर कलमांखाली गुन्हे नोंदवून त्यांना तातडीने गजाआड करावे.

या संवेदनशील प्रकरणाचा सखोल तपास करून संपूर्ण कथित रॅकेटचा पर्दाफाश करावा व संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास सकल हिंदू समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने ‘हिंदू जनआक्रोश’ मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी उसळली होती आणि कार्यकर्त्यांनी निष्पक्ष तपासाची मागणी करत संतप्त भावना व्यक्त केल्या.

COMMENTS