Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गॅस, पेट्रोल बरोबरच विश्वासाची टंचाई !युद्धाच्या जनसामान्यांना झळा; मुबलकचा दावा, मग गर्दी का ?

जामखेड : गेल्या काही दिवसांपासून इस्राईल इराक युद्धामुळे जगाच्या नकाशावर युद्धजन्य परस्थिती व टंचाई निर्माण झाली आहे. युद्धात सहभागी नसलेल्या देशातील जनतेलाही युद्धाच्या परिणामांच्या झळा लागत आहेत.  गँस, पेट्रोल, डिझेल अशा इंधनाच्या वितरणाचा जागतिक पातळीवर विस्कळीतपणा झाला आहे. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून देशांतर्गत वितरणावरही ताण आला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे सरकार आणि प्रशासन सांगतेय की गॅस टंचाई नाही. पेट्रोल टंचाई नाही. इंधन तुटवडा नाही. दुसरीकडे नागरिकांची गॅससाठी, पेट्रोलसाठी रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. याला खरे कारण आहे, तो म्हणजे जनतेचा उडालेला विश्वास. बहुतांश नागरिकांचा सरकार आणि प्रशासनावर विश्वासच राहिलेला नाही. सरकारी यंत्रणेकडून अधिकृत माध्यमांतून खुलासे केले जात असले तरी लोकांचा जास्त विश्वास शोसलमिडीयावर व अनधिकृत सुत्रांवरच जास्त आहे. त्यामुळे टंचाई आहे ती विश्वासाची आहे. नागरिकांचा यंत्रणेवर आणि यंत्रणेचा नागरिकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यातून ही स्थिती झाल्याचे दिसून येते.   देशात लोकांना भुलवून राजकीय सत्ता काबीज करण्याचे जे राजकीय षडयंत्री प्रकार चालतात, त्याचे परिणाम अशावेळी दिसून येतात. आपली फसगत होतेय,आपली फसगत होऊ शकते, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झालेली असते, त्यामुळे लोक व्यक्तीगत विचार करून आपला आपला मार्ग शोधत धावाधाव करतात. सरकारी यंत्रणा व राजकीय नेते आपल्यासाठीच आहेत, ते नक्की उपाय करतील यावर लोकांचा विश्वास राहिलेला नसतो. यातूनही अशा कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते तशा गोष्टी घडतात. जबाबदारपणे वागण्यात देशप्रेम सरकारी यंत्रणा जी माहिती देणार, ती खरीच असणार, त्यावर विश्वास ठेवून सहकार्य केले पाहिजे, असे नागरिकांना वाटत नाही. अर्थात पूर्वीच्या काही अनुभवातून जनतेचे हे मत बनलेले असते. हा अविश्वास सर्वांत घातक असतो. संपूर्ण देशाने ज्या काळात संयम ठेवणे अपेक्षित असते, त्या काळात जर बहुतांश नागरिक स्वार्थीपणे वागत तूर्त गरज नसताना स्वतःच्या पदरात वस्तू पाडून घेण्यासाठी धडपडू लागणे हे चित्र चांगले नाही. देशप्रेम केवळ सोशल मीडियातून आणि तोंडदेखल्या कृतीतून व्यक्त करण्याची गोष्ट नाही. जेव्हा देशावर संकटाचे सावट असते, तेव्हा आपण व्यापक हीत लक्षात घेऊन किती जबाबदारपणे वागतो, यात ते देशप्रेम असते. एकजुटीची गरज  सध्या उद्भवलेल्या परिस्थितीवर अनेक ठिकाणी पर्याय शोधण्यास सुरुवात झाली आहे. आपण सर्वांनी अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. बाहेरच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परस्थितीला देशांतर्गत एकजुटीने सामोर जात या आव्हानाचा सामना करण्याची गरज आहे.

राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल व एलपीजी सुरळीत; अफवांपासून दूर राहण्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा
भारताला अर्जेंटिनाकडून एलपीजीच्या मदतीचा हात

जामखेड : गेल्या काही दिवसांपासून इस्राईल इराक युद्धामुळे जगाच्या नकाशावर युद्धजन्य परस्थिती व टंचाई निर्माण झाली आहे. युद्धात सहभागी नसलेल्या देशातील जनतेलाही युद्धाच्या परिणामांच्या झळा लागत आहेत.  गँस, पेट्रोल, डिझेल अशा इंधनाच्या वितरणाचा जागतिक पातळीवर विस्कळीतपणा झाला आहे. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून देशांतर्गत वितरणावरही ताण आला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

एकीकडे सरकार आणि प्रशासन सांगतेय की गॅस टंचाई नाही. पेट्रोल टंचाई नाही. इंधन तुटवडा नाही. दुसरीकडे नागरिकांची गॅससाठी, पेट्रोलसाठी रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.

याला खरे कारण आहे, तो म्हणजे जनतेचा उडालेला विश्वास. बहुतांश नागरिकांचा सरकार आणि प्रशासनावर विश्वासच राहिलेला नाही. सरकारी यंत्रणेकडून अधिकृत माध्यमांतून खुलासे केले जात असले तरी लोकांचा जास्त विश्वास शोसलमिडीयावर व अनधिकृत सुत्रांवरच जास्त आहे. त्यामुळे टंचाई आहे ती विश्वासाची आहे. नागरिकांचा यंत्रणेवर आणि यंत्रणेचा नागरिकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यातून ही स्थिती झाल्याचे दिसून येते.

  देशात लोकांना भुलवून राजकीय सत्ता काबीज करण्याचे जे राजकीय षडयंत्री प्रकार चालतात, त्याचे परिणाम अशावेळी दिसून येतात. आपली फसगत होतेय,आपली फसगत होऊ शकते, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झालेली असते, त्यामुळे लोक व्यक्तीगत विचार करून आपला आपला मार्ग शोधत धावाधाव करतात. सरकारी यंत्रणा व राजकीय नेते आपल्यासाठीच आहेत, ते नक्की उपाय करतील यावर लोकांचा विश्वास राहिलेला नसतो. यातूनही अशा कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते तशा गोष्टी घडतात.

जबाबदारपणे वागण्यात देशप्रेम

सरकारी यंत्रणा जी माहिती देणार, ती खरीच असणार, त्यावर विश्वास ठेवून सहकार्य केले पाहिजे, असे नागरिकांना वाटत नाही. अर्थात पूर्वीच्या काही अनुभवातून जनतेचे हे मत बनलेले असते. हा अविश्वास सर्वांत घातक असतो. संपूर्ण देशाने ज्या काळात संयम ठेवणे अपेक्षित असते, त्या काळात जर बहुतांश नागरिक स्वार्थीपणे वागत तूर्त गरज नसताना स्वतःच्या पदरात वस्तू पाडून घेण्यासाठी धडपडू लागणे हे चित्र चांगले नाही. देशप्रेम केवळ सोशल मीडियातून आणि तोंडदेखल्या कृतीतून व्यक्त करण्याची गोष्ट नाही. जेव्हा देशावर संकटाचे सावट असते, तेव्हा आपण व्यापक हीत लक्षात घेऊन किती जबाबदारपणे वागतो, यात ते देशप्रेम असते.

एकजुटीची गरज 

सध्या उद्भवलेल्या परिस्थितीवर अनेक ठिकाणी पर्याय शोधण्यास सुरुवात झाली आहे. आपण सर्वांनी अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. बाहेरच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परस्थितीला देशांतर्गत एकजुटीने सामोर जात या आव्हानाचा सामना करण्याची गरज आहे.

COMMENTS