Homeताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन महत्त्वाच्या घाटमार्गांवर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. भोर

पीक विम्यासाठी संभाजी ब्रिगेडचे महसूल मंडळ पाटोदा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू
कर्जा मुळे अनेक शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार
ठाण्यात मुसळधार पावसाने दाणादाण! रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप, ड्रेनेज व्यवस्थेचे उडाले बारा!
pune sinhagad pune crack fell at sinhagad accident was avoided due to road closed | Pune Sinhagad Fort News: सिंहगडावर जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली; वाहतूक बंद असल्यानं दुर्घटना टळली


पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन महत्त्वाच्या घाटमार्गांवर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. भोर-महाड मार्गावरील वरंध घाट आणि खेडशिवापूर ते राजगड तालुक्याला जोडणार्‍या कुसगाव खिंडीत दरडी कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पंढरपूर-महाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 डीडी अंतर्गत येणार्‍या वरंध घाटात शिरगाव गावाच्या हद्दीत आज मोठी दरड कोसळली. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ही घटना घडली. दरडीसोबत माती, मोठे दगड आणि झाडेझुडपांचा राडारोडा थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

COMMENTS