Homeताज्या बातम्या

पीक विम्यासाठी संभाजी ब्रिगेडचे महसूल मंडळ पाटोदा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू

 दि. 7 जुलै: सन 2025 च्याखरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने नुकस

मॅनहोलने नव्हे व्यवस्थेने घेतलेला बळी !
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीतहवामान विभागाचा आज पावसाचा रेड अलर्ट ; प्रशासन सतर्क
ठाण्यात मुसळधार पावसाने दाणादाण! रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप, ड्रेनेज व्यवस्थेचे उडाले बारा!

 दि. 7 जुलै: सन 2025 च्या
खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने नुकसानभरपाई दिली असली तरी शेतकर्‍यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोणत्याही अटी-शर्ती न लावता प्रति हेक्टर 17,500 रुपये पीक विमा मंजूर करून संपूर्ण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांना तातडीने वितरित करावा, या प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेड, अंबाजोगाई यांच्या वतीने महसूल मंडळ पाटोदा येथे बेमुदत साखळी उपोषणास आजपासून सुरुवात करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात, ई-पीक पाहणीतील त्रुटी, पीक विमा मंजुरीतील विलंब, शासनाने जाहीर केलेल्या मदतीची तात्काळ अंमलबजावणी तसेच शेतकर्‍यांना न्याय मिळावा या मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास 9 ऑगस्टपासून मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या खोडसे, तालुकाध्यक्ष संभाजी घोरपडे, जिल्हा सचिव नारायण मुळे मामा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
उपोषणस्थळी बोलताना पदाधिकार्‍यांनी सांगितले की, शासनाने जाहीर केलेला प्रति हेक्टर 17,500 रुपयांचा पीक विमा कोणत्याही अटी-शर्तीशिवाय तातडीने वितरित करावा. अन्यथा संभाजी ब्रिगेडचा हा लढा अधिक तीव्र करून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

COMMENTS