Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काळभैरवनाथ-जोगेश्वरी माता सप्ताहास प्रारंभ

श्रीगोंदा : तालुक्यातील भोळे वस्ती येथे काळभैरवनाथ-जोगेश्वरी माता सप्ताहाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भोळे वस्ती येथे गेल्या तीन वर्षांपासून हा धार्मिक सप्ताह आयोजित केला जात असून, यंदाही भक्तिभावाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी वडगाव शिंदोडी येथील ह.भ.प. संभाजी महाराज पवार यांनी प्रभावी कीर्तन सादर केले. त्यांनी श्रीराम, लक्ष्मण तसेच आई-वडिलांची सेवा, देशसेवा आणि धर्मसेवेचे महत्त्व पटवून दिले. तसेच त्यांनी स्वातंत्र्यवीर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाची आठवण करून देत त्यांच्या कार्याचे स्मरण केले. “ए वतन तेरे लिए…” हे गीत सादर करून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याविषयीही त्यांनी प्रेरणादायी माहिती दिली. पिंगळा गाण्याने कीर्तनाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमास आयोजक शिवाजी राजे शेळके, गोपीचंद लबडे, शिवसेना नगरसेवक अनिल महाराज औटी,  नगरसेवक दादासाहेब औटी, नगरसेवक सुशील शिंदे, गणेश बोरुडे, सोनू कोथिंबिरी, अश्विनी ताई धुमाळ, गायकवाड महाराज, नाना शिंदे, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. भोळे वस्ती येथील ग्रामस्थांनी उत्कृष्ट नियोजन करत कार्यक्रम यशस्वी केला. शेळके परिवाराच्या वतीने भाविकांसाठी अन्नदानाचेही आयोजन करण्यात आले.

श्रीगोंद्यात भर रस्त्यात गॅस सिलेंडर वितरण; नागरिकांची कोंडी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
तीन वर्षांत गुन्हेगारीवर मोठा लगाम; श्रीगोंदा पोलिसांची धडक कारवाई; २८७६ गुन्हे दाखल, २३९८ गुन्ह्यांची उकल
विधानसभेत हुंडाबळी कायद्याच्या कथित गैरवापराबाबत आ. पाचपुते आक्रमक

श्रीगोंदा : तालुक्यातील भोळे वस्ती येथे काळभैरवनाथ-जोगेश्वरी माता सप्ताहाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भोळे वस्ती येथे गेल्या तीन वर्षांपासून हा धार्मिक सप्ताह आयोजित केला जात असून, यंदाही भक्तिभावाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी वडगाव शिंदोडी येथील ह.भ.प. संभाजी महाराज पवार यांनी प्रभावी कीर्तन सादर केले. त्यांनी श्रीराम, लक्ष्मण तसेच आई-वडिलांची सेवा, देशसेवा आणि धर्मसेवेचे महत्त्व पटवून दिले.

तसेच त्यांनी स्वातंत्र्यवीर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाची आठवण करून देत त्यांच्या कार्याचे स्मरण केले. “ए वतन तेरे लिए…” हे गीत सादर करून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याविषयीही त्यांनी प्रेरणादायी माहिती दिली. पिंगळा गाण्याने कीर्तनाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमास आयोजक शिवाजी राजे शेळके, गोपीचंद लबडे, शिवसेना नगरसेवक अनिल महाराज औटी,  नगरसेवक दादासाहेब औटी, नगरसेवक सुशील शिंदे, गणेश बोरुडे, सोनू कोथिंबिरी, अश्विनी ताई धुमाळ, गायकवाड महाराज, नाना शिंदे, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

भोळे वस्ती येथील ग्रामस्थांनी उत्कृष्ट नियोजन करत कार्यक्रम यशस्वी केला. शेळके परिवाराच्या वतीने भाविकांसाठी अन्नदानाचेही आयोजन करण्यात आले.

COMMENTS