Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत धर्म विचारून चाकू हल्लामीरा रोडवरील घटना, एटीएसकडून तपास सुरू

मुंबई : मीरा रोड परिसरात घडलेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेने आता गंभीर रूप धारण केले असून, या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसकडे सोपवण्

छत्रपती शिवाजी महाराजांवरील वाद ‘निरर्थक’मुख्यमंत्री फडणवीस : समाजात तणाव पसरवू नका
पुण्यात पुन्हा टोळीसंघर्ष भडकलाअक्षय म्हस्केची गोळ्या झाडून हत्या
वशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा पारीत कराआमदार रोहित पवारांची राज्य सरकारकडे मागणी


मुंबई : मीरा रोड परिसरात घडलेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेने आता गंभीर रूप धारण केले असून, या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. सुरुवातीला साधा गुन्हा वाटणार्‍या या घटनेत पुढे काही संशयास्पद बाबी उघडकीस आल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मीरा रोड (पूर्व) येथील नया नगर परिसरात ही घटना घडली. त्या वेळी दोन सुरक्षा रक्षक-राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो रमेश सेन-ड्युटीवर होते. आरोपीने प्रथम परिसरात येऊन मशिदीचा रस्ता विचारला. काही वेळानंतर तो पुन्हा परतला आणि एका रक्षकाचा धर्म विचारत अचानक त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यानंतर आरोपीने सुरक्षा केबिनमध्ये घुसून दुसर्‍या रक्षकाला धार्मिक वाक्य म्हणण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. ते शक्य न झाल्याने त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. जखमी दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या प्रकरणात 31 वर्षीय जुबेर अन्सारी याला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर 4 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपीच्या घराची झडती घेतली असता काही हस्तलिखित नोट्स आणि संशयास्पद साहित्य आढळून आले. या नोट्समध्ये काही संवेदनशील आणि टोकाच्या विचारसरणीचे संकेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे या घटनेकडे केवळ गुन्हेगारी कृत्य म्हणून न पाहता व्यापक सुरक्षेच्या दृष्टीनेही तपास केला जात आहे. जुबेर अन्सारी हा विज्ञान शाखेचा पदवीधर असून काही काळ तो अमेरिकेत वास्तव्यास होता. नंतर भारतात परतल्यानंतर तो मीरा रोड परिसरात एकटाच राहत होता. तो ऑनलाइन केमिस्ट्रीचे वर्ग घेत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या काळात तो इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून टोकाच्या विचारांकडे झुकला असावा, असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलिस आणि एटीएस आरोपीचा मोबाईल, इंटरनेट वापर, सोशल मीडिया हालचाली आणि संपर्क जाळ्याचा सखोल अभ्यास करत आहेत. हा हल्ला एकट्याने केला की त्यामागे इतर कोणाचे समर्थन किंवा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

COMMENTS