मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला या मृत्यूंमागे नेमके कार

मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला या मृत्यूंमागे नेमके कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्क मांडले जात होते. मात्र, आता समोर आलेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार अन्नविषबाधेमुळे किडनी निकामी झाल्याने या चौघांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन, तसेच मुली आएशा आणि जैनब या चौघांचा मृत्यू झाला आहे. 25 एप्रिल रोजी रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास कुटुंबातील सदस्यांनी नातेवाईकांसोबत एकत्र भोजन केले होते. त्या वेळी सर्वांनी चिकन बिर्याणी खाल्ली होती. यानंतर पाहुणे घरी परतल्यानंतर, मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास या चौघांनी घरात ठेवलेले कलिंगड खाल्ले. काही तासांतच म्हणजे पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. चारही जणांना तीव्र उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागली. स्थिती गंभीर होत असल्याने शेजार्यांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात अन्नातून विषारी घटक शरीरात गेल्याने किडनीवर गंभीर परिणाम झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेचे अचूक कारण शोधण्यासाठी मृतांच्या अवयवांचे नमुने (व्हिसेरा) न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून, अंतिम अहवालानंतरच स्पष्ट निष्कर्ष समोर येणार आहे.

COMMENTS