Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. शरद पवारांनी बोलवली पवार कुटुंबियांची बैठक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रमुख खा. शरद पवार यांनी मंगळवारी संपूर्ण पवार कुटुंबीयांना एकत्र येण्यासाठी निमंत्रित केले आहे.

बिनविरोधची शक्यता मावळली !
वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल : मुख्यमंत्री फडणवीस; वैद्यकीय सेवेसाठी जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता
अजितदादांच्या अपघाताआधी बारामतीत अघोरी पूजा; माजी आमदार अमोल मिटकरींचा पुन्हा खळबळजनक दावा


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रमुख खा. शरद पवार यांनी मंगळवारी संपूर्ण पवार कुटुंबीयांना एकत्र येण्यासाठी निमंत्रित केले आहे. बारामती येथील त्यांच्या ‘मोदीबाग’ निवासस्थानी होणार्‍या या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, या निमंत्रणामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
या बैठकीसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांनाही उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे ही बैठक केवळ कौटुंबिक आहे की तिच्यामागे काही राजकीय संकेत दडले आहेत, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या दिवशी शरद पवार उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते, त्यामुळे त्यांना मतदान करता आले नव्हते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत विविध चर्चा रंगत असतानाच त्यांनी सर्व कुटुंबीयांना एकत्र बोलावल्याने या बैठकीकडे अधिक लक्ष वेधले गेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार सध्या पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी असून लवकरच ते मुंबईला रवाना होणार आहेत. त्याआधी सर्व कुटुंबीयांनी एकत्र जेवणासाठी भेटावे, या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जाते. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहाबाबत चर्चा करण्यासाठीही ही बैठक असू शकते, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

COMMENTS