Homeताज्या बातम्या

डॉ. प्रल्हाद लुलेकरांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

छत्रपती संभाजीनगर : लक्ष्मीबाई राजगडकर स्मृती प्रतिष्ठान, नागपूरच्या वतीने दिला जाणारा नेताजी राजगडकर वैचारिक ग्रंथ पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडक

‘यूट्यूब रिपोर्टर’ म्हणजे पत्रकार नव्हेमाध्यम स्वातंत्र्याच्या गैरवापराबाबत उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
त्रिपुराच्या डीजीपीचा कार्यालयात आढळला मृतदेह
जपान ओपन जिंकणारी पी. व्ही. सिंधू पहिली भारतीयदोन सेटमध्येच प्रतिस्पर्धी खेळाडूचा करेक्ट कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर : लक्ष्मीबाई राजगडकर स्मृती प्रतिष्ठान, नागपूरच्या वतीने दिला जाणारा नेताजी राजगडकर वैचारिक ग्रंथ पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख तथा प्रसिद्ध विचारवंत तथा समीक्षक, डॉ. प्रल्हाद जी. लुलेकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार डॉ. लुलेकर लिखित ‘अनंत पैलूंचा योद्धा : दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या ग्रंथासाठी देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. शेतकरी नेते विजय जावंधिया, ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, माजी उपनगराध्यक्ष अशोक रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. लुलेकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

COMMENTS