Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये भाजपचे आक्रोश आंदोलन

नांदेड : महिलांना संसद व विधानमंडळांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावे, राजकीय निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या

संसदेचे आजपासून विशेष अधिवेशन; नारीशक्ती वंदन कायदा विधेयक लोकसभेत मांडणार
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह लवकरच भारत दौर्‍यावर
निवडणूक आयोग भाजपचा मित्रपक्षपश्‍चिम बंगाल निकालांवर खा. संजय राऊतांची टीका

नांदेड : महिलांना संसद व विधानमंडळांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावे, राजकीय निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महिला आरक्षणाच्या मागणीला न्याय मिळावा या भूमिकेतून केंद्र सरकारने आणलेल्या ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’च्या समर्थनार्थ नांदेड शहरात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा व महिला आघाडीच्या वतीने आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
नारीशक्ती के साथ काँग्रेस का धोका, महिलाओं के सन्मान में भाजपा युवा मोर्चा मैदान में, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.  माजी आमदार अमिताभाभी चव्हाण, भोकर विधानसभेचे आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार तथा भाजपाचे महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर, महापौर कविता मुळे, महिला आघाडीचे अध्यक्षा नगरसेविका ज्योतीताई कल्याणकर, महिला बालकल्याण तथा शिक्षण विभागाच्या सभापती सदिच्छा सोनी- पाटील, महापालिकेतील महिला नगरसेविका, युवा मोर्चाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या मोर्चात भाजपचे स्थानिक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवा मोर्चाचे सदस्य आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या वेळी मोदी यांच्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चादरम्यान वक्त्यांनी सांगितले की, महिलांना संसदेत आरक्षण देण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेत महिलांना न्याय देण्याचे धाडस दाखवले. महिलांना सन्मान, प्रतिनिधित्व आणि समान संधी देणारा हा कायदा असून, देशाच्या लोकशाही इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी काँग्रेससह विविध विरोधी पक्षांवरही टीका करण्यात आली. या विधेयकाला विरोध करून महिलांच्या आशा-अपेक्षांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप वक्त्यांनी केला. महिलांना दुय्यम स्थान देणारी मानसिकता अजूनही काही पक्षांमध्ये असल्याचा दावा करत अशा विचारसरणीचा निषेध करण्यात आला. महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, महिला सक्षमीकरण हे केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कायद्याच्या माध्यमातून अंमलात आणण्याचे कार्य मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे देशातील महिला शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. महिलांना संसदेत योग्य स्थान, निर्णयक्षम भूमिका आणि सन्मान मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार मोर्चाच्या शेवटी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS