Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उमरी-सावंतवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत यजमान संघाची बाजी; प्रथम क्रमांकावर कब्जा

केज : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उमरी-सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रीमियर ल

उमरी/सावंतवाडी प्रीमियर लीगवर ‘यजमान’ उमरी संघाचे वर्चस्व; दहीटना उपविजेता! विष्णुभाऊ घुले यांच्या हस्ते 51,111 चे प्रथम पारितोषिक प्रदान
सूर्यकांत काळे यांच्यासारख्या शिक्षकांची समाजाला गरज-खा.बजरंग सोनवणे;केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांचा सेवागौरव सोहळा थाटात; शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
जुना वादातून केजच्या सुर्डी फाटा येथे भरदिवसा हत्या; आरोपीला तासाभरात बेड्या

केज : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उमरी-सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार अत्यंत उत्साहात पार पडला. चुरशीच्या आणि रोमांचक अंतिम सामन्यात यजमान उमरी-सावंतवाडी संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला असून शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगतदार राहिला. विविध संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. प्रथम पारितोषिक : उमरी-सावंतवाडी संघ – 51,111 व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक : दहीटना संघ, तृतीय पारितोषिक : केज संघ, चतुर्थ पारितोषिक : कोठी संघ बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, अशा स्पर्धांमुळे युवकांमध्ये सांघिक भावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि क्रीडासंस्कृती विकसित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सोनू सावंत, नाना मुळे, गणेश मुळे, विठ्ठल मुळे, नवनाथ सावंत, विकास मुळे, रामदास मुळे यांच्यासह समस्त उमरी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. उत्कृष्ट मैदान व्यवस्था, शिस्तबद्ध नियोजन आणि खेळाडूंना उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांमुळे स्पर्धेला विशेष उठाव मिळाला. परिसरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला, त्यामुळे शिवजयंतीचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला.

COMMENTS