Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंधारे मॅडम…नगर परिषदेच्या लेखा विभागात नेमका काय गोंधळ चालू आहे…

माहिती अधिकारात मागणी केलेली माहिती दडवून ठेवली जातीये बिक्कड साहेब लक्ष द्या- अजय सरवदे

बीड प्रतिनिधी - नगरपरिषद बीड येथील मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी तत्कालीन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना मालामाल करणारे योगेश हाडे यांच्या म

पती-पत्नीच्या वादात दोन लहानग्यांचा नाहक बळी गेला l पहा LokNews24
गट शिक्षणाधिकार्‍यांना काढल्या जाणार नोटीसा ; शाळाबाह्य मुलांची माहितीच पाठवली नाही
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडून गंभीर मारहाण

बीड प्रतिनिधी – नगरपरिषद बीड येथील मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी तत्कालीन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना मालामाल करणारे योगेश हाडे यांच्या माध्यमातून नगरपरिषद बीड येथे भ्रष्टाचार चालू आहे. इंजि.योगेश हाडे यांच्यावर काही महिन्यापूर्वी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती परंतु मुख्याधिकारी नीता अंधारे मॅडम यांनी पदभार घेतल्यापासून इंजि.योगेश हाडे यांना पुन्हा नगरपालिकेमध्ये मुख्य जबाबदार्‍या दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. निलंबित केलेल्या हाडे यांना कोणत्या आधारे नगरपालिकेमध्ये पदभार दिला जातो याची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे. माहिती अधिकारात लेखा विभागाअंतर्गत 2020 ते आज पर्यंत दिलेले सीसी/प्रमाणके/धनादेश पुस्तिका पहावयास देण्यात यावा यासाठी वारंवार अर्ज करूनही तसेच स्मरणपत्र देऊ नये जन माहिती अधिकारी येळवे मॅडम, इंजि.योगेश हाडे व मुख्याधिकारी नीता अंधारे मॅडम संगणमताने सदरील माहिती दडून ठेवत असल्याचे स्पष्ट निदर्शनास आले आहे.
तत्कालीन मुख्याधिकारी न.प.बीड व प्रधानमंत्री आवास योजनेचे इंजि. योगेश हाडे यांनी संगनमत करून न.प.च्या सा.बां. विभागामध्ये पूर्वी झालेल्या कामाचे नव्याने लाखो रुपयाचे बोगस मोजमाप पुस्तिका बनवत लेखा विभागाच्या अडून लाखो रुपयाची शासनाची फसवणूक केली आहे तसेच योगेश रामभाऊ हाडे यांच्या स्वाक्षरीसह लेखा विभागात दाखल करण्यात आलेल्या सर्व कागदपत्राची संचिकेची तातडीने चौकशी करण्यात यावी. याविषयी असंख्य तक्रारी देऊनही कारवाई केली जात नाही. मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या सर्व कामकाजाची सखोल चौकशी करावी अशी मागणी वंचितचे युवा नेते अजय सरवदे यांनी प्रादेशिक उपायुक्त नगर परिषद प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद व जिल्हा प्रशासन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे कडे केली आहे.

COMMENTS