Homeताज्या बातम्या

शिर्डीत रिक्षाचालकांची कागदपत्रे तपासणी मोहीम

शिर्डी : शिर्डी शहरात औषध उपचारासाठी आलेल्या एका रुग्णास व नातेवाईकास रिक्षा चालकाने मारहाण करून आर्थिक लुटीच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या माध्

किनवट-माहूरच्या उंबरठ्यावर न्यायाची नवी पहाट: जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाला प्रशासकीय मोहोर
प्रा. प्रवीण सरवदे यांना लोकप्रशासन विषयात पीएच.डी. प्रदान
डॉक्टरांचा संप तातडीने मागे घ्या : उच्च न्यायालयाचे निर्देश
ठाण्यातील ९४ टक्के रिक्षाचालक मराठीबहाद्दर; RTO च्या तपासणीत उघड

शिर्डी : शिर्डी शहरात औषध उपचारासाठी आलेल्या एका रुग्णास व नातेवाईकास रिक्षा चालकाने मारहाण करून आर्थिक लुटीच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शुक्रवारी सकाळपासून रिक्षा, अपे रिक्षा या वाहनांची मोठ्या प्रमाणावर धरपकड करण्यात येऊन कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख मुम्मुका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर उपनिरीक्षक किरण शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर सुरू होती.

शिर्डी शहरात अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षा विना कागदपत्रे, विना लायसन, पियुसी नसणे, चालकांची क्राईम पडताळणी, इन्शुरन्स परमीट विना गणवेश, नो पार्किंग, प्रदुषण करत असलेल्या जुनाट परजिल्ह्यातील पासिंग रिक्षा असलेल्या विविध वाहनावर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

COMMENTS