महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत कुंडलवाडी येथील ‘के. रामलू पब्लिक स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या यशस्वी परंपरेला पुढे नेले आहे.
यंदाच्या परीक्षेत शाळेतील एकूण 74 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, त्यामध्ये इयत्ता 5 वीतील 38 तर इयत्ता 8 वीतील 36 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली आहे. इयत्ता 8 वीमध्ये कु. आशिष अंजया जायेवार याने 242 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. श्रेयश संजय कासलोड याने 224 गुणांसह द्वितीय तर मनोज माधव लोलापोड याने 208 गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. इयत्ता 5 वीमध्ये कु. आयुष साईनाथ बुड्डावार व सेहान खुबेब अब्दुलखालिद शेख यांनी प्रत्येकी 200 गुण मिळवत संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला. तर कु. श्रेया गजानन लिमशेट्टे हिने 188 गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शहर व परिसरातून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे अध्यक्ष साईरेड्डी ठक्कुरवार, सचिव यशवंत संगमवार, संचालिका रमा ठक्कुरवार, प्राचार्य एस. जाधव, उपप्राचार्या एम. सपना तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले.

COMMENTS