कोपरगाव शहर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये शहरातील संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेच्या ‘संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल’ने यशाची उत्तुंग भरारी घेत सलग दहाव्या वर्षी १०० टक्के निकालाची देदीप्यमान परंपरा कायम राखली आहे. अतिशय उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या १० वर्षांत शाळेचा एकही विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला नाही. नारायणी नितीन शिंदे हिने ९४ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ आस्था किशोर देवडे हिने ८९ टक्के गुणांसह द्वितीय, तर साईश्री गणेश कानडे हिने ८८.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, उपाध्यक्ष किरण भोईर, विश्वस्त व पत्रकार राजेंद्र सालकर, कैलास जाधव, पोपट झुरळे, विशाल झावरे, ऍड. शंकर यादव,मुख्याध्यापक सचिन मोरे, उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे यांच्यासह सर्व शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.”गेल्या दशकापासून संत ज्ञानेश्वर स्कूलने शंभर टक्के निकालाची परंपरा केवळ टिकवलीच नाही, तर गुणवत्तेचा आलेखही सातत्याने उंचावला आहे. हे आमच्या शिक्षकांच्या अहोरात्र कष्टाचे, शालेय शिस्तीचे आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासू वृत्तीचे फळ आहे. तंत्रज्ञान आणि मूल्यांची सांगड घालत, भविष्यातही विद्यार्थ्यांना असेच दर्जेदार व आधुनिक शिक्षण देण्यासाठी आमची संस्था सदैव कटिबद्ध राहील असे संस्थेचे विश्वस्त विशाल झावरे यांनी सांगितले.

COMMENTS