श्रीगोंदा : मातीचा सुगंध अंगात, डोळ्यांत मोठं स्वप्न आणि जिद्दीच्या जोरावर थेट न्यायासनापर्यंत झेप घेणारी यशोगाथा श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील शितल नानासाहेब थोरात यांनी घडवली आहे. त्यांच्या न्यायाधीशपदी झालेल्या निवडीमुळे संपूर्ण तालुक्याचा मान उंचावला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शितल यांचे प्राथमिक शिक्षण हंगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण हंगेश्वर माध्यमिक विद्यालयात पूर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि आपल्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा दिली. शेतकरी कुटुंबातील मुलगी असलेल्या शितल यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले. श्रीगोंदा तालुक्यातून न्यायाधीशपदी निवड होणाऱ्या त्या पहिल्याच युवती ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामागे कुटुंबाचा भक्कम पाठिंबा लाभला. मामा न्यायाधीश दादासाहेब गोपीनाथ म्हस्के, प्रा.कृष्णा गोपीनाथ म्हस्के, तसेच चुलते सुभाष किसन थोरात यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. वडील नानासाहेब थोरात हे किराणा व्यवसाय करत असून त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ दिले. “जिद्द असेल तर वाट नक्की सापडते,” हे वाक्य शितल यांच्या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गावाकडच्या मुलींनाही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा देणारी ही यशोगाथा ठरली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून निघालेली वाट आता थेट न्यायाच्या दरबारात पोहोचली असून श्रीगोंद्याचा झेंडा पुन्हा एकदा उंच फडकला आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

श्रीगोंदा : मातीचा सुगंध अंगात, डोळ्यांत मोठं स्वप्न आणि जिद्दीच्या जोरावर थेट न्यायासनापर्यंत झेप घेणारी यशोगाथा श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील शितल नानासाहेब थोरात यांनी घडवली आहे. त्यांच्या न्यायाधीशपदी झालेल्या निवडीमुळे संपूर्ण तालुक्याचा मान उंचावला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शितल यांचे प्राथमिक शिक्षण हंगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण हंगेश्वर माध्यमिक विद्यालयात पूर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि आपल्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा दिली.
शेतकरी कुटुंबातील मुलगी असलेल्या शितल यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले. श्रीगोंदा तालुक्यातून न्यायाधीशपदी निवड होणाऱ्या त्या पहिल्याच युवती ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामागे कुटुंबाचा भक्कम पाठिंबा लाभला. मामा न्यायाधीश दादासाहेब गोपीनाथ म्हस्के, प्रा.कृष्णा गोपीनाथ म्हस्के, तसेच चुलते सुभाष किसन थोरात यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
वडील नानासाहेब थोरात हे किराणा व्यवसाय करत असून त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ दिले. “जिद्द असेल तर वाट नक्की सापडते,” हे वाक्य शितल यांच्या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
गावाकडच्या मुलींनाही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा देणारी ही यशोगाथा ठरली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून निघालेली वाट आता थेट न्यायाच्या दरबारात पोहोचली असून श्रीगोंद्याचा झेंडा पुन्हा एकदा उंच फडकला आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

COMMENTS