Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत तालुक्यातील पर्यटन विकासासाठी 4 कोटी 25 लाखांचा निधी

आ. प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून मिळाला निधी : तालुकाध्यक्ष खरमरे

कर्जत : प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आ. प्रा. राम शिंदे यांच्या प्

सीनाचे आवर्तन सोडण्याचे आ. राम शिंदे यांचे आदेश
कर्जतमध्ये संगीतमय कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम उत्साहात
राज्य सरकारच्या विरोधात सुजय विखे, राम शिंदे, शिवाजी कर्डीले बसले उपोषणाला (Video)

कर्जत : प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आ. प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून 4 कोटी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या रकमेस जिल्हाधिकारी, अहमदनगर  यांच्याकडे प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
आ. प्रा. राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील पर्यटन स्थळे विकसित करण्याच्या दृष्टीने विविध पर्यटन स्थळांच्या अंतर्गत येणार्‍या देवस्थानांना पायाभुत सुविधा पुरवून त्या ठिकाणी विविध पर्यटक, भाविक, नागरिक यांना विविध सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या निधीतून आता देवस्थानांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास होणार आहे. या योजनेअंतर्गत चांदा खुर्द येथील सुप्रसिध्द जागृत देवस्थान मारुती मंदिर येथे प्रवेशद्वार कमान, मंदिराकडे जाणारा रस्ता क्राँक्रीटीकरण करणे, सभामंडप बांधणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, पुरुष व महिलांकरिता स्वच्छतागृह बांधणे, स्वयंपाक खोली व शेड बांधणे, मोरी बांधकाम करणे, बोअरवेल घेणे व सुशोभिकरण करणे या सर्व कामांसाठी 1 कोटी 50 लाख रुपये एवढा निधी उपलब्ध केलेला आहे. खातगाव येथील आनंदी नारायण कृपान्यास संस्था येथील विविध विकास कामे करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. बिटकेवाडी येथील तुकाई मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी 25 लाख, वालवड येथील कान्होळा नंदेश्‍वर मंदिर परिसराच्या विकासासाठी 25 लाख, थेटेवाडी येथील ढगेश्‍वर मंदिर परिसराच्या विकासासाठी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्यातून हा निधी उपलब्ध झाल्याने आ. प्रा. राम शिंदे यांनी कर्जत- जामखेड येथील जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही या कामी सहकार्य लाभल्याने जनतेच्या वतीने त्यांचेही आभार मानण्यात आले आहेत.

भाविकांना सुविधा देणे होणार शक्य- आ. प्रा. राम शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून पर्यटन विकास विभागातून हा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या देवस्थानांमध्ये येणार्‍या भाविक भक्तांना विविध सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. या देवस्थानांच्या विकासातून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त करत आ. प्रा. राम शिंदे यांचे आभार मानले असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी म्हटले आहे.

COMMENTS