Homeव्हिडीओ

बालमटाकळीत 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याची कामे पूर्ण

https://youtu.be/gxBdW4MuxP0 भारत फोर्ज पुणे या कंपनीने केलेली बंधाऱ्याची कामे शेतकऱ्यांसाठी वरदान - डॉ , लीना देशपांडे बालमटाकळीत 950 मीटर लांब

रोहित पवार यांच्या सरसकट कर्जमुक्ती आंदोलनाला किसान संघर्ष समितीचा सक्रिय पाठिंबा
कांदा विकूनही शेतकरी झाला कर्जबाजारी; १ टन कांद्याच्या बदल्यात शेतकऱ्यालाच भरावा लागला १ रुपया!
कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक

भारत फोर्ज पुणे या कंपनीने केलेली बंधाऱ्याची कामे शेतकऱ्यांसाठी वरदान – डॉ , लीना देशपांडे बालमटाकळीत 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याची कामे पूर्ण ,
पुणे येथील भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या बंधार्‍याची कामे करीत असून 132 गावांच्या विकासाची कामे भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून केल्या जात असून अहिल्यानगर जिल्ह्याच्या बालमटाकळी येथे ही कामे सुरू असल्याने केलेल्या बंधाऱ्याची कामे ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरो असे भारत फोर्ज कंपनीच्या प्रमुख श्रीमती डॉक्टर लीना देशपांडे यांनी म्हटले आहे ,
पुणे येथील भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून अर्थ व तंत्र साहाय्याने केलेले बालमटाकळी येथील कांबी रस्त्यावरील 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याच्या खोलीकरणाची केलेली कामाची पाहणी भारत फोर्ज कंपनीच्या प्रमुख श्रीमती डॉक्टर लेना देशपांडे व कंपनीचे समन्वयक जयदीप लाड यांनी करून समाधान व्यक्त केले ,
पाऊस काळात जवळ आल्याने आणि बंधाऱ्याच्या खोली करण्याची कामे झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता पिकासाठी व विहिरींना ‘ बोर साठी मुबलक पाणी साठा होणार असल्याने कंपनीचे आभार मानण्यात आले ,
यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे , डॉक्टर कृष्णा देहाडराय ,
मधुकर पाटेकर , सुरेश काजवे , राजेश छाजेड , वाघोली चे सरपंच उमेश भालसिंग ,श्याम राजपुरे , अमोल बामदळे , दीपक देशमुख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते

COMMENTS