Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भूमाता फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम महिलांना साडी वाटप

देगलूर प्रतिनिधी - पवित्र रमजान ईद निमित्त भूमाता फाउंडेशनचे माध्यमातून देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील महिलांना नवीन साड्या देऊन त्यांना ईदच्या

अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा
राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्थेच्या कोथळी शाखेचा शुभारंभ
लोकसभेसाठी पाच जागा द्या, अन्यथा सर्व पर्याय खुले

देगलूर प्रतिनिधी – पवित्र रमजान ईद निमित्त भूमाता फाउंडेशनचे माध्यमातून देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील महिलांना नवीन साड्या देऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आला .भूमाता फाउंडेशनच्या अध्यक्ष तृप्तीताई देसाई यांच्यावतीने हानेगाव परिसरातील गरीब निराधार अपंग स्त्रियांना नवीन साड्या वाटप करण्यात  आल्या. भूमाता फाउंडेशनच्या देगलूर तालुक्याचे अध्यक्ष मगदूम भाई शेख यांच्या हस्ते या साड्यांचे वाटप करण्यात आले .भूमाता फाउंडेशनच्या अध्यक्ष तृप्तीताई देसाई यांनी खास पुण्याहून या साड्या पाठवल्या होत्या. या फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविले जातात याचाच एक भाग म्हणून रमजान ईद रोजी गरजू लोकांना याचा लाभ भेटेल या हेतूने तालुकाध्यक्ष मगदूम भाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी असंख्य गरजू लोकांनी याचा लाभ मिळाला आणि या कार्याच कौतुक केले यावेळी भूमाता बिग्रेडचे कार्यकर्ते. शेख अहेमद.समद चौधरी.राहुल भुताळे. इमरान पटेल.शेख मुस्तफा.मुखीद चौधरी. सैफुद्दीन काझी. अदनान चौधरी.  आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS