Homeताज्या बातम्यासंपादकीय

उमदे नेतृत्व आणि वैद्यकीय क्षेत्र ! 

महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले. ही बाब अतिशय दुःखदायक आहे. अर्थात त्यांच्याविषयी लिहिणं हा या ठिकाणी मुद्दा

लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र ! 
जहाजाला छिद्र अन् उंदरांची दाणादाण ! 
ओबीसींना न्याय नाकारणारे आरक्षण मागताहेत ! 

महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले. ही बाब अतिशय दुःखदायक आहे. अर्थात त्यांच्याविषयी लिहिणं हा या ठिकाणी मुद्दा नाहीये तर अत्यंत आधुनिक अशा आरोग्य सुविधा उपलब्ध असतानाही कमी वयाच्या व्यक्तीला वाचवणे किती अवघड आहे, ही बाब वैद्यकीय तंत्रज्ञान आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा यांनी सिद्ध केली आहे काय? असा प्रश्न साहजिकच निर्माण होते. वैद्यकीय सेवा सुविधांच्या बाबतीत एम्स हे अत्यंत अत्याधुनिक आणि तितकेच अनुभवी तज्ञ असलेल्या या हॉस्पिटलमध्ये राजकीय नेत्यांना नेण्याऐवजी खाजगी हॉस्पिटल मध्ये नेण्याची गरज का पडते, हा या अनुषंगाने निर्माण होणारा प्रश्न आहे. वास्तविक कोरोना काळानंतर जगभरातल्या आरोग्य सुविधा आणि साधने यामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. कोरोना काळातच भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील स्टार्टअप उद्योगांची आकडेवारी  दोन बिलियन डॉलर एवढी विस्तारली. इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया आणि प्रॅक्सिस ग्लोबल अलायन्सने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, २०२० मध्ये भारताच्या आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्राचे मूल्य दोनशे अब्ज होते. तथापि, जवळपास साडेआठ हजार पेक्षा अधिक हेल्थ-टेक स्टार्टअप्स सुरू झाले. जे सध्या भारतातील हेल्थकेअर उद्योगाच्या वाढीला चालना देत आहेत. या उद्योगाच्या भवितव्याने मोठी झेप घेतली आहे. २०२१ मध्ये  आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रात १३१ हून अधिक सौदे झाले. भारतातील हेल्थकेअर इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी अतिरिक्त उभारणी केल्या जात आहेत. भारतातील हेल्थ टेक इकोसिस्टम कोरोना साथीच्या रोगापासून भरभराटीला आली आहे.  गेल्या तीन वर्षांत अनेक स्केल हेल्थकेअर स्टार्टअप्स उदयास आले आहेत.  हे स्टार्टअप्स भारतातील डिजिटल आरोग्याला आणखी समर्थन देण्यासाठी वापरत असलेले काही नाविन्यपूर्ण मार्ग येथे आहेत. मात्र एवढ्या आधुनिक वैद्यकीय सुविधा क्षेत्र विस्तारूनही गेल्या तीन वर्षाच्या आतच  महाराष्ट्रातील दोन तरुण खासदारांचा ( राजीव सातव, बाळू धानोरकर) मृत्यू  वैद्यकीय क्षेत्राचे तोकडेपण उघडे करणारी आहे का? यावर एकदा गंभीर विचार करणे गरजेचे आहे. माणसांची आयुर्मर्यादा जगभर वाढत असताना, अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तींचे आयुर्मान मात्र अशा पद्धतीने खासकरून भारतात कमी होत असेल, तर, ती बाब भारतीय आरोग्य तंत्रज्ञान आणि एकूणच वैद्यकीय ज्ञानाला आव्हान ठरावी अशीच आहे. हे खरेच आहे की मानवी जीवनात शरीराला जडणाऱ्या व्याधी या आकस्मात, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे धोक्याच्या पातळीवर येऊ शकतात; परंतु, वैद्यकीय क्षेत्राला त्याचे सकारण स्पष्टीकरण देता आले पाहिजे. केवळ प्रसारमाध्यमातून एखाद्या व्यक्तीचे सर्व ऑर्गन्स किंवा शरीरातील महत्त्वपूर्ण स्नायू यांनी काम करणे बंद केल्यामुळे अशा प्रकारचा मृत्यू झाला, एवढे ठोकताळे चर्चेत आणणे पुरेसे नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एअर अंबुलन्सने रूग्णाला नेले जात  असताना त्यापूर्वीच त्याचे आकलन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांना का होत नाही, ही बाब त्याहूनही गंभीर आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना काळातच एक किस्सा सार्वजनिक रित्या सांगितला होता की, त्यांचे एक विश्वासू कर्मचारी असलेले व्यक्ती, कोरोना काळात अत्यंत गंभीर अवस्थेत पोहोचल्यानंतर त्या रुग्णाला नागपूरहून चेन्नईला एअर ॲम्बुलन्स ने पाठवलं आणि शर्तीचे प्रयत्न करून त्या रुग्णाला त्यावेळी वाचवले. आज तर  कोरोनासारखा साथीचा काळ नाही. त्यामुळे दोन दिवसापूर्वी अतिशय चांगल्या अवस्थेत असलेल्या एखाद्या राजकीय उमद्या नेत्याचा, असा सहज मृत्यू होणे, ही बाब निश्चितपणे वैद्यकीय क्षेत्रासाठी चिंतेची आहे आणि एकंदरीत भारतातील वैद्यकीय क्षेत्राच्या ज्ञानाला ही आव्हान ठरावी अशीच आहे!

COMMENTS