Homeताज्या बातम्या

मांजरसुंबा उर्दू अध्यापक विद्यालयात शिक्षकांचा तीव्र तुटवडा; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, पंकजा मुंडेंकडे पुन्हा निवेदन

बीड: मांजरसुंबा येथील शासकीय अध्यापक विद्यालय (उर्दू माध्यम) येथे गेल्या वर्षभरापासून एकही कायमस्वरूपी प्राध्यापक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यां

लग्नाला नकार दिल्याने बँक कर्मचाऱ्याची गळा दाबून हत्या; मृतदेह जाळून आत्महत्येचा बनाव, इंदूरमधील धक्कादायक प्रकार
उद्धव ठाकरेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश, एकनाथ शिंदेंनाही समन्स जारी
पुनर्वसित गावांसाठी ८५ कोटींची विकासखैरात; कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, ठेकेदारांना लाभाचा आरोप

बीड: मांजरसुंबा येथील शासकीय अध्यापक विद्यालय (उर्दू माध्यम) येथे गेल्या वर्षभरापासून एकही कायमस्वरूपी प्राध्यापक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत असल्याचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा गोपीनाथराव मुंडे यांना सय्यद शोहिब आमदार (भाजपा बीड जिल्हा अल्पसंख्यांक सरचिटणीस व समाजसेवक) तसेच जिया शेख यांनी मांजरसुंबा येथे भेटून निवेदन सादर केले.

यापूर्वी सुमारे आठ महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक कैलास गणपतराव दातखिळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्राध्यापकांची नियुक्ती करण्याबाबत सूचना दिली होती. त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना आवश्यक प्राध्यापक उपलब्ध करून देण्याचे लेखी आदेशही दिले होते. मात्र, त्या आदेशाला आठ महिने उलटूनही संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून कायमस्वरूपी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, सुरुवातीला मिलिया कॉलेज बीड, इंदिरा गांधी विद्यालय बीड आणि बहादुर शाह जफर कॉलेज नेकनूर येथील प्राध्यापकांना रोटेशन पद्धतीने काही महिन्यांसाठी तोंडी आदेशाद्वारे अध्यापनासाठी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, सध्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्षात २६ आणि द्वितीय वर्षात २० असे एकूण ४६ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिकविण्यासाठी एकही शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

शिक्षण उपसंचालकांच्या लेखी आदेशाचीही दखल न घेता नियुक्ती प्रक्रिया रखडल्याने तातडीने कायमस्वरूपी प्राध्यापकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी सय्यद शोहिब आमदार यांनी केली आहे. तसेच, लवकरात लवकर शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास बीड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयाला गावकऱ्यांच्या वतीने कुलूप ठोकून बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण विभाग व संबंधित प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS