Homeताज्या बातम्या

बीडच्या मिल्लिया गर्ल्स प्रायमरी स्कूलमध्ये अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम; चित्रकला स्पर्धेत विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग

बीड: राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त (२२ जुलै) बीड शहरातील भलदारपुरा येथील मिल

वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी)नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक
अंधश्रद्धेविरोधात बीडमध्ये ‘गीत जागर’चा जागर; वर्धापनदिनानिमित्त अंनिसचे जनजागृती अभियान
मतभेद असणं म्हणजे असंस्कृतपण नव्हे !
Milliya Junior College in Shivaji Chowk,Beed - Best Arts Colleges near me  in Beed - Justdial

बीड: राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त (२२ जुलै) बीड शहरातील भलदारपुरा येथील मिल्लिया गर्ल्स प्रायमरी स्कूलमध्ये विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी सजलेला प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. जयंतीचे औचित्य साधत विद्यालयात विद्यार्थिनींसाठी विशेष चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मिर्झा कनीज फातेमा तसेच प्रभारी कादरी रिझवाना बेगम यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतात अजित पवार यांच्या प्रशासकीय कार्यशैली, शिस्तप्रिय नेतृत्व, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा घेत विद्यार्थिनींना त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

यानंतर आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत विविध वर्गांतील विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पर्यावरण संरक्षण, स्वच्छ भारत, शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक ऐक्य, राष्ट्रप्रेम, महिला सक्षमीकरण आणि निसर्ग संवर्धन आदी विषयांवर विद्यार्थिनींनी आकर्षक व कल्पक चित्रे साकारून आपल्या कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन करण्यासाठी विद्यालयातील फैसल सर, बिबी हाजरा बाजी, साबिया खतीब बाजी, मसरत सुलताना अन्सारी बाजी, नजुम साहेर खतीब बाजी, सना बाजी आणि शाझिया बाजी यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थिनींचे मुख्याध्यापिका मिर्झा कनीज फातेमा तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS