Homeताज्या बातम्याबीड

हक्काच्या बोनससाठी महावितरण कर्मचारी आक्रमकबीड सर्कल कार्यालयासमोर ’द्वारसभा’ व जोरदार निदर्शने

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी कृती समितीच्या वतीने आज बीड जालना रोड येथील सर्कल कार्यालयासमोर भव्य ’द्वारसभा’ आयोजित करण

बीडमध्ये रखडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम, अवैध कत्तलखाने प्रकरणी भाजप आक्रमक
शहरातील कॅफे बंद कराआ.सोळंके यांची पोलीस निरीक्षकाकडे मागणी
मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बीडमध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न



महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी कृती समितीच्या वतीने आज बीड जालना रोड येथील सर्कल कार्यालयासमोर भव्य ’द्वारसभा’ आयोजित करण्यात आली होती. प्रलंबित बोनस, सानुग्रह अनुदान आणि संपाच्या पार्श्वभूमीवर सिम कार्डवर होणार्‍या कारवाईच्या विरोधात कर्मचार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने केली.
गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी आपल्या हक्काच्या सानुग्रह अनुदानाची (बोनस) मागणी करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचार्‍यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, संपाच्या काळात सिम कार्ड वापरण्यावरून कर्मचार्‍यांवर जी कारवाई केली जात आहे, ती अन्यायकारक असल्याचे मत कृती समितीने व्यक्त केले. या आंदोलनाचे नियोजन कृती समितीमधील 16 प्रमुख संघटनांनी मिळून केले आहे. या संदर्भात 30 एप्रिल 2026 रोजीच प्रशासनाला रीतसर नोटीस देण्यात आली होती. आज झालेल्या या द्वारसभेत सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यालयाचा परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता. प्रमुख मागण्या मध्ये    कर्मचार्‍यांना तात्काळ सानुग्रह अनुदान (बोनस) मंजूर करण्यात यावे. संपाच्या अनुषंगाने सिम कार्ड संदर्भात सुरू केलेली दंडात्मक कारवाई थांबवण्यात यावी.  कर्मचार्‍यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. आमच्या हक्काचा बोनस आम्हाला मिळेपर्यंत आणि कर्मचार्‍यांवरील अन्यायकारक कारवाई थांबेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा कृती समितीच्या वतीने यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे महावितरण प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS