Homeताज्या बातम्यादेश

शंभू सीमेवर शेतकरी-पोलिसांत धुमश्‍चक्री

चर्चा निष्फळ ; शेतकर्‍यांवर अश्रूधुराचा मारा

नवी दिल्ली ः केंद्र सरकारसोबत शेतकर्‍यांची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंजाबचे 14 हजार शेतकरी शंभू सीमेवरून 1200 ट्रॅक्टर-ट्

राहुरीमध्ये हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ
Yeola : येवल्यात कांदा व्यापाऱ्यांनी पाडला लिलाव बंद | loknews24
 सोयाबीनच्या दरात घसरण

नवी दिल्ली ः केंद्र सरकारसोबत शेतकर्‍यांची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंजाबचे 14 हजार शेतकरी शंभू सीमेवरून 1200 ट्रॅक्टर-ट्रॉलींमधून हळूहळू दिल्ली सीमेकडे जात आहेत. दुसरीकडे खनौरी सीमेवरून शेतकरीही हरियाणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबत येथे 800 ट्रॅक्टर आहेत. शेतकर्‍यांना रोखण्यासाठी पोलिसांनी ड्रोनमधून दोन वेळा अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. अश्रुधुरापासून बचाव करण्यासाठी शेतकर्‍यांनी खास मास्क, ओल्या सॅक आणि गॉगल घातले होते. साऊंड कॅननचा सामना करण्यासाठी शेतकर्‍यांनी खास इयर बड्स आणले आहेत.
केंद्र सरकारसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. जेसीबी-पोकलेन मशीन घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीकडे रवाना होत आहेत. शेतकर्‍यांना रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्लीला लागून असलेल्या राज्यांच्या सीमा सील केल्या असून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अशातच हरियाणातील शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये पुन्हा एकदा चांगलीच झटापट झाली आहे. घोषणाबाजी करत सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही शेतकर्‍यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच सौम्य लाठीमार देखील केला. यावेळी शेतकर्‍यांची मोठी पळापळ झाली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री अर्जून मुंडा यांनी पुन्हा एकदा शेतकर्‍यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. शेतकर्‍यांनी आपले आंदोलन थांबवावे तसेच दिल्लीच्या दिशेने जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र, शेतकरी कुणाचंही ऐकण्यास तयार नाही. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर दिल्लीत धडकणारच असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा उच्च न्यायालयात पोहचले आहे. शंभू सीमेवर ट्रॅक्टर, जेसीबी आणि पोकलेन मशीन जमा करणे हा कायदा आणि सुव्यवस्थेला हा मोठा धोका आहे, पंजाब सरकारने यावर कारवाई करावी असे हरियाणा म्हणत हरियाणा सरकारने कोर्टात धाव घेतली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांची शेतकर्‍यांना नवी ऑफर – शेतकर्‍यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी शेतकर्‍यांचे प्रतिनीधी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या. परंतु, या सर्व फेर्‍या अपयशी ठरल्या आहेत. अशातच केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी आंदोलकांना बुधवारी नवी ऑफर दिली आहे. कृषीमंत्र्यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, चार बैठकांनंतर सरकार आता पाचव्या बैठकीत एमएसपीची मागणी, तन (गवत) जाळण्याचा विषय, पिक बदलणे, शेतकर्‍यांवरील दाखल गुन्हे याबाबत चर्चा करण्यासाठी तयार आहे. तसेच याबाबत चर्चेसाठी मी शेतकरी नेत्यांना आमंत्रित करतो. मला वाटते की, आपण शांतता राखायला हवी. त्यामुळे शेतकरी या ऑफरवर काय पवित्रा घेतात, त्यावर पुढील आंदोलन अवलंबून असणार आहे.  

COMMENTS