Homeताज्या बातम्या

चंद्रशेखर आझाद यांनी यूपी निवडणुकीचे रणशिंग फुंकले

लखनौ : आझाद समाज पक्षाचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक हालचालींना वेग

आरक्षण उपवर्गीकरणाबाबत सरकार सकारात्मक; लवकरच निर्णय- गिरीश महाजन6 जुलै रोजी मुंबईत प्रा. रामचंद्र भराडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट
आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपाइंचे २७ जुलै रोजी जिल्हाभर तीव्र निदर्शने
फायदा आणि तोटा पाहणारे आम्ही नाहीततेलगाव येथे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध
Azad Samaj Party List | Chandrashekhar Azad 2027 UP Election Strategy


लखनौ : आझाद समाज पक्षाचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे. पक्षाने राज्यातील 45 विधानसभा मतदारसंघांसाठी प्रभार्‍यांची पहिली यादी जाहीर केली असून, विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या नियुक्त्यांमधून दिसून येतो.
जाहीर करण्यात आलेल्या यादीत 18 अनुसूचित जाती, 10 मुस्लिम, 16 इतर मागासवर्गीय आणि 1 शीख समाजातील नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पहिल्या यादीत ब्राह्मण आणि ठाकूर समाजातील कोणत्याही नेत्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणांच्या दृष्टीने या निर्णयाकडे लक्ष वेधले जात आहे. हाथरस मतदारसंघासाठी माजी भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी आदित्य प्रकाश वर्मा, तर छर्रा मतदारसंघासाठी माजी मंत्री महेंद्र सिंह यांच्यासह अनेक अनुभवी आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या नेत्यांवर पक्षाने विश्‍वास व्यक्त केला आहे. पहिल्या यादीत पश्‍चिम उत्तर प्रदेशातील मतदारसंघांना प्राधान्य देण्यात आले आहे. मेरठ, मुझफ्फरनगर, शामली, हापुड, आग्रा, अलीगड, मथुरा, बरेली, बदायूं आणि शाहजहानपूर या भागांमध्ये संघटना अधिक मजबूत करण्यावर पक्षाचा भर असल्याचे दिसून येते. दलित आणि मुस्लिम मतदारसंख्या लक्षणीय असलेल्या भागांत पक्षाची पकड वाढविण्याच्या उद्देशाने ही रणनीती आखल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. प्रभार्‍यांच्या नियुक्तीत विविध समाजघटकांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनुसूचित जातींसोबतच यादव, गुर्जर, प्रजापती, वाल्मीकी, मौर्य आदी इतर मागासवर्गीय समाजातील नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. तसेच दहा मुस्लिम नेत्यांचा समावेश करून पश्‍चिम उत्तर प्रदेश आणि पूर्वांचल या दोन्ही भागांतील सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न पक्षाने केल्याचे मानले जात आहे. या यादीत विविध पक्षांतून पूर्वी निवडणूक लढलेले किंवा आपल्या मतदारसंघात प्रभाव राखणार्‍या काही प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे. गोवर्धनमधून दीपक चौधरी, फतेहपूर सिक्रीमधून जगदीश बघेल, गोविंद नगरमधून तुलसीराम वाल्मीकी आणि मऊ जिल्ह्यातील मधुबन मतदारसंघातून शिवसागर यादव यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपविली आहे.
दलित राजकारणात स्पर्धा तीव्र
बहुजन समाज पक्षानेही विधानसभा स्तरावर संघटनात्मक तयारी सुरू केल्यामुळे दलित मतदार आणि बहुजन राजकारणाच्या केंद्रस्थानी दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आझाद समाज पक्षाची ही संघटनात्मक मोर्चेबांधणी राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची ठरू शकते.

COMMENTS