Homeव्हिडीओ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ताप आणि थकवा जाणवू लागल्याने ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असून लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यत

https://youtu.be/U_fgDtM88mI महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामु

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एनडीएत विलय होणार? मुख्यमंत्र्यांनी चर्चा फेटाळून लावली!
महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरणजम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट
किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील सततचे दौरे आणि कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना ताप, शरीरदुखी आणि प्रचंड थकवा जाणवत होता. या त्रासामुळे रात्री उशिरा, म्हणजेच पहाटे ३ च्या सुमारास त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू आहेत. प्रकृती ठीक नसल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम आणि बैठका तूर्तास रद्द करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून, सर्व आवश्यक आरोग्य तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS