नांदेड : जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच एसआयआर मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने लवकरच जिल्हाभर क

नांदेड : जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच एसआयआर मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने लवकरच जिल्हाभर कार्यकर्ता मेळाव्यांची मालिका आयोजित करण्यात येणार असून, या उपक्रमाचा पहिला मेळावा सिडको येथे होणार असल्याची माहिती दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. सिडको परिसरात काँग्रेसचे संघटन अधिक व्यापक आणि बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आगामी संघटनात्मक मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.3) सिडको-वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीची बैठक खा.रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बैठकीत सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी संघटनात्मक कार्याचा आढावा सादर करत आगामी कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी नव्याने निवड झालेल्या तिन्ही अध्यक्षांचा सिडको काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. बैठकीस प्रल्हाद गव्हाणे, डॉ. अशोक कलंत्री, ज्योती कदम, गोपीनाथ कहाळेकर, माणिक श्रोते, किशन रावणगावक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन गौतम पवार यांनी केले. यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफार आणि सिडको ब्लॉक अध्यक्ष बापूसाहेब पाटील उपस्थित होते. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे पदाधिकार्यांनी स्वागत करून संघटन बळकटीसाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.

COMMENTS