Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

नेवासे पोलिसांनी आरोपीला केली अटक

भालगाव/प्रतिनिधी ः नेवासे तालुक्यातील बेलपांढरी येथील एका 24 वर्षीय तरुणीवर गावातीलच एका नराधमाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून अत्

कुटुंब जिव्हाळा आणि शैक्षणिक कळवळा हेच शिक्षकांचे तपोधन ः प्राचार्य अनारसे
नेवासा येथील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी भारतीय लहूजी सेनेचे उपोषण
वैष्णोदेवीनंतर शाहरुख खान साईबाबांच्या नगरीत दाखल

भालगाव/प्रतिनिधी ः नेवासे तालुक्यातील बेलपांढरी येथील एका 24 वर्षीय तरुणीवर गावातीलच एका नराधमाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे, याप्रकरणी तरुणीने नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी निलेश झिंजुर्डे याला ताब्यात घेतले आहे.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, बेलपांढरी गावातील तरूणीवर याच गावातील तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले आहे. अत्याचार केल्यामुळे ही तरूणी गर्भवती राहिल्यानंतर या नराधमाने या तरुणीला ’तु काळजी करु नको, मी माझ्या घराच्यांना सांगतो, आपण लग्न करु ? असे आमिष दाखवत राहिला. शेवटी ही मुलगी गर्भवती राहिल्याचे घरच्यांना समजल्यानंतर याप्रकरणी त्या युवकाकडे लग्नासाठी तगादा लावण्यात येत होता, मात्र सदद युवकाने लग्न केलेच नाही. त्यामुळे या युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीसांनी या नराधमावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. बेलपांढरी येथील युवतीने नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, याच गावात राहणार्‍या निलेश झिंजुर्डे याने दोन वर्षापूर्वी निलेश याने माझा हात धरुन ’मला तु खुप आवडते, मी तुझ्याशी लग्न करेन, असे म्हणून त्याने त्याची मावशीच्या घराच्या पाठीमागे नेले माझ्यावर बळजबरीने सबंध बनवले. त्यानंतर मला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवत माझ्याशी संबंध बनवत गेला. नंतर मी गर्भवती राहिले. यानंतर आरोपीने तू जर घरच्यांना आपल्यामध्ये असे काही झाले आहे, याची वाच्यता केली तर, तुझ्या भावाला आणि बापाला मारून टाकीन, अशा धमक्या देत वर्ष 2021 पासून वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून, तसेच बापाला व भावाला मारुन टाकण्याच्या धमक्या देवून माझ्यासोबत बळजबरीने लैंगिक संबंध ठेवुन माझ्यावर बलात्कार केलेला आहे अशी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नेवासे पोलिसांनी थेट दिंडीतून आरोपीच्या मुसक्या आवळून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 दिंडीतून आरोपीला घेतले ताब्यात – नेवासा पोलिस ठाण्याचे निरिक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी बलात्काराची फिर्याद दाखल होताच पोलिस कॉस्टेबल बबन तमनर, शाम गुंजाळ, सुमित करंजकर यांचे पथक आरोपीच्या शोधासाठी पाठवून बेलपांढरी (ता.नेवासा) येथून विठुरायाच्या भेटीला निघालेल्या दिंडीतून बनपिंपरी (ता.श्रीगोंदा) येथून आरोपीला नेवासा पोलीसांनी अटक केली आहे.

COMMENTS