Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिरपुरात पोटच्या मुलानेच केला जन्मदात्या आई-वडिलांचा खून; खलबत्ता-मुसळाने केले प्रहार

धुळे : जिल्ह्यातील शिरपूर शहरातील महावीर विहार सेक्टर क्रमांक २, प्लॉट क्रमांक ३८, चंद्रमोळी महादेव मंदिराजगील परिसरात शुक्रवारी दुपारी एक अत्यंत

राहुरी गोळीबार प्रकरणातील आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद; मुळा धरण परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
तोहीद खान हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावीकामरान खान शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख बीड
पुणे विषारी दारूने हादरले; १५ जणांचा बळी, मुख्य संशयितांसह आतापर्यंत ९ जणांना अटक अवैध हातभट्टी व्यवसायाविरोधात कठोर कारवाईचे आदेश
Dhule Crime News: Son Kills Parents with Pestle in Shirpur Over Insult in  Front of Wife

धुळे : जिल्ह्यातील शिरपूर शहरातील महावीर विहार सेक्टर क्रमांक २, प्लॉट क्रमांक ३८, चंद्रमोळी महादेव मंदिराजगील परिसरात शुक्रवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. सून समोर असताना वडिलांनी रागावल्याच्या कारणावरून पोटच्या मुलानेच आपल्या आई-वडिलांचा निर्घृण खून केल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चंदन (वय २८, मूळ रा. बिहार) याने आपली आई रंजुदेवी महोतो (वय ४२) आणि वडील इंदराम महोतो (वय ६०) यांच्यावर घरातील दगडी खलबत्ता आणि मुसळाच्या साहाय्याने जबर मारहाण करून त्यांचा जागीच खून केला. मृत इंदराम महोतो हे करवंद येथील मका फॅक्टरीत ठेकेदार म्हणून कार्यरत होते. गेल्या दोन वर्षांपासून हे कुटुंब शिरपूर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. २५ एप्रिल रोजी हे कुटुंब मुलीच्या लग्नासाठी बिहारला गेले होते. लग्न आटोपल्यानंतर आरोपी चंदन आणि त्याची पत्नी दोन-तीन दिवसांपूर्वीच शिरपूरला परतले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी आई-वडीलही शिरपुरात दाखल झाले.

दुपारी २ वाजेच्या सुमारास घरात वाद निर्माण झाला. सून समोर असताना वडिलांनी आपल्याला रागावल्याची बाब आरोपी चंदनच्या मनाला लागली होती. याच किरकोळ कारणावरून त्याने संतापाच्या भरात नियंत्रण गमावले आणि थेट आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला चढवला. खलबत्ता आणि मुसळाने डोक्यात वारंवार प्रहार केल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

दुहेरी खून करून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी चंदनला शिरपूर पोलिसांनी तत्परता आणि चातुर्य दाखवत अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे शिरपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS