Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिनागुंडाच्या जंगलातील माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; गडचिरोली पोलिसांचे मोठे यश

गडचिरोली : जिल्हा नक्षलमुक्त होण्याच्या घोषणेपूर्वी नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला मोठा शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना म

‘गर्भलिंग’ प्रकरणी दोघांना अटक, आरोपींची संख्या २१ वर
शिरपुरात पोटच्या मुलानेच केला जन्मदात्या आई-वडिलांचा खून; खलबत्ता-मुसळाने केले प्रहार
पुणे विषारी दारूने हादरले; १५ जणांचा बळी, मुख्य संशयितांसह आतापर्यंत ९ जणांना अटक अवैध हातभट्टी व्यवसायाविरोधात कठोर कारवाईचे आदेश
Gadchiroli Naxal Weapons Factory Destroyed By Police | गडचिरोलीत  नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

गडचिरोली : जिल्हा नक्षलमुक्त होण्याच्या घोषणेपूर्वी नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला मोठा शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे आणि स्फोटके हुडकून काढली आहेत.

पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षलवादी जंगलात मोठ्या प्रमाणावर स्फोटक साहित्य आणि शस्त्रे लपवून ठेवतात. नक्षलविरोधी अभियान, नक्षल सप्ताह आणि निवडणुकीच्या काळात या स्फोटकांचा वापर केला जात असे. परंतु, पोलिसांनी १६ मे रोजी राबविलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत कंपनी क्रमांक १० व अन्य दलमच्या ५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. चौकशीदरम्यान त्यांनी बिनागुंडाच्या जंगलात स्फोटके लपवून ठेवल्याची व तेथे शस्त्रे तयार केली जात असल्याची माहिती दिली.

यानंतर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा व गोकुळ राजजी, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ मे रोजी जंगलात विशेष मोहीम आखण्यात आली. पोलीस अभियान पथक, अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील ६ पथके आणि बॉम्ब शोधक व नाशक विभागाच्या (BDDS) २ पथकांनी या भागात शोधमोहीम सुरू केली.

दुसऱ्या दिवशी पोलिसांनी बिनागुंडा गावाच्या उत्तरेकडील जंगलात शोध घेतला असता, तिथे मोठ्या प्रमाणावर स्फोटके, शस्त्रे आणि अन्य साहित्य आढळून आले. यामध्ये एक लेथ मशीन (Lathe Machine), बीजीएल पाईप, १२ बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडिंग व ड्रिलिंग मशीन, जिग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल आणि फुटबॉल पाईप इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हे साहित्य घटनास्थळीच नष्ट केले आहे.

COMMENTS