Homeताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; बीड जिल्ह्यात एकाच दिवशी ३ ठिकाणी छापे, १२ लाखांचा गुटखा जप्त

बीड : जिल्ह्यात अवैध गुटखा साठवणूक, विक्री आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी धडक मोहीम राबवली आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ

’मकोका’मधील फरार आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईलने केली अटक
शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई: नगर रोड परिसरातील ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर छापा; ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटक
बकरी ईदनिमित्त पेठ बीड पोलीस ठाण्यात शांतता समिती व सर्व समाजाची बैठक; सलोख्याने सण साजरा करण्याचे आवाहन

बीड : जिल्ह्यात अवैध गुटखा साठवणूक, विक्री आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी धडक मोहीम राबवली आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी तब्बल १२ लाख १३ हजार ८०० रुपयांचा गुटखा आणि वाहने जप्त केली आहेत. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन स्वतंत्र पथकांनी बीड शहर, युसूफ वडगाव आणि सिरसाळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही समांतर कारवाई केली.

अशी झाली कारवाई:

  • बीड शहर : बसस्थानकासमोर बेकायदेशीररीत्या गुटखा साठवून ठेवणाऱ्या एका इसमाला रंगेहात पकडून त्याच्याकडून २ लाख २१ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.
  • युसूफ वडगाव : एका स्विफ्ट कारमधून गुटख्याची वाहतूक केली जात असताना पोलिसांनी सापळा रचून कारसह एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
  • सिरसाळा (मौजे पोहनेर) : एका रिक्षा टेम्पोमधून विक्रीसाठी नेला जाणारा ५ लाख ४२ हजार ८०० रुपये किमतीचा गुटखा आणि टेम्पो जप्त करण्यात आला.

या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १२ लाख १३ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, महेश विघ्ने, सुशांत सुतळे यांच्यासह एलसीबीच्या अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

COMMENTS